Diwali Pandharpur Vitthal Rukmini Mandir : आज नरकचतुर्दशी निमित्त परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल आणि रुक्मिणीला (Vitthal Rukmini) ठेवणीतील हिरेजडित अलंकार परिधान करण्यात आले आहेत. दीपावलीनिमित्त विठ्ठल मंदिराला (Vitthal Rukmini Mandir) आकर्षक विद्युत रोषणाई ( attractive electric lighting) देखील करण्यात आली आहे. विठ्ठल भक्तांनी मंदिरात रांगोळ्याच्या पायघड्याही घातल्या आहेत. विठ्ठल आणि रुक्मिणीला दागिने परिधान केल्यानं देवाचं रुप 'सावळे सुंदर रुप मनोहर' या उक्तीप्रमाणे अधिकच सुंदर दिसत आहे.
देवाला कोणते दागिणे केले परिधान?
विठ्ठलास सोन्याचा मुकुट, कौस्तुभ मणी, दंडपेठया, हिऱ्याचे कंगन जोड, मोत्याचा तुरा, मारवाडी पेठांचा मोत्यांचा हार, मोत्याची कंठी, शिरपेच, मोहरांची माळ, तुळशीची माळ, तोडे जोड, मत्स्य जोड, पदकासह लॉकेट असे हिरेजडित दागिने परिधान केले आहेत. तर श्री रुक्मिणी मातेस सुवर्ण मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवामनी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मी हार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादि अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई
आज नरकचतुर्दशी निमित्ताने श्री. विठ्ठल सभा मंडप येथे श्री.नंदू शिंदे, मुंबई यांनी श्री. विठ्ठलाची आकर्षक रांगोळी साकारली आहे. विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली असून दिवाळीनिमित्त विठ्ठल मंदिर विविध रंगाने उजळून निघाले आहे. दरवर्षी दिवाळी सणाच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदीरावर आकर्षक रोषणाई केली जाते. तसेच देवाला दागिणे परिधान केले जातात.
राम मंदिराच्या दर्शन व्यवस्थेप्रमाणे विठ्ठल मंदिरातही टोकन दर्शन व्यवस्था सुरु होणार
कार्तिकी एकादशी 12 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्या निमित्ताने 4 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या काळात श्री विठ्ठल रुक्मिणीचं 24 तास दर्शन सुरू राहणार आहे. यंदाच्या कार्तिकी यात्रेत आयोध्या येथील राम मंदिराच्या दर्शन व्यवस्थेप्रमाणे विठ्ठल मंदिरातही टोकन दर्शन व्यवस्था सुरू होणार आहे. यामुळे विठुरायाची लांबच लांब दर्शन रांग आता इतिहास जमा होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या व्यवस्थेसाठी मंदिराला निधी देत चार मजली दर्शन मंडप बांधण्याच्या कामास हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यामुळे आता देशभरातील लाखो भाविकांना विठुरायाचे सुलभ व झटपट दर्शन होणे शक्य होणार आहे.
महत्वाच्या बातम्या: