चंद्रपूर : चंद्रपूर पोलिसांनी काल गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या लाठीचार्ज विरोधात आज भानापेठ येथे निषेध सभा आयोजित करण्यात आली. यावेळी निषेध सभेत पोलिसांच्या डीजेविरोधी भूमिकेचा आणि पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यात आला.
संताजी सभागृहात आयोजित या निषेध सभेत चंद्रपूर शहरातील गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि डीजे व्यावसायिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. डीजे संबंधात असलेल्या नियमांचा चुकीचा अर्थ लावून पोलीस विनाकारण वाद निर्माण करत असल्याचं गणेश मंडळांचं म्हणणं आहे.
विशेष म्हणजे या निषेध सभेची कुणकुण लागताच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना डीजे वाजवण्यास परवानगी देण्याचे निर्देश दिले.
गणेशोत्सवाच्या चार दिवसात ही परवानगी दिली जाणार असून 75 डेसिबलची मर्यादा पाळण्यात यावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक या संदर्भात लवकरच आदेश जारी करणार आहेत.
चंद्रपुरातील गणेश मंडळांना डीजेसाठी परवानगी देण्याचे मुनगंटीवारांचे आदेश
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Sep 2018 10:34 PM (IST)
चंद्रपुरातील गणेश मंडळं नाराज असल्याची कुणकुण लागताच चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी डीजेसाठी परवानगी देण्यात यावी, असे आदेश दिले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -