नागपूर : कुख्यात गुंड अरुण गवळी पुन्हा एकदा पॅरोलवर तुरुंगाबाहेर येणार आहे. अरुण गवळीला पॅरोल रजा देण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने दिले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 21 ऑक्टोबरला डॉन अरुण गवळीला तुरुंगातून पॅरोलवर सोडण्याचे आदेश दिला आहेत. गवळीची पत्नी आजारी असल्याने गवळीने पॅरोलची विनंती केली होती.

गवळीने तुरुंग प्रशासनाकडे पॅरोलची विनंती केली होती. मात्र, तुरुंग प्रशासनाने पॅरोल नाकारल्याने न्यायालयात याचिका दाखल केली होती.

येत्या 25 ऑक्टोबरला मुंबईतील हॉस्पिटलमध्ये अरुण गवळीच्या पत्नीचं ऑपरेशन होणार आहे. त्यानिमित्ताने पॅरोलजची रजा मिळणार आहे. मात्र, 2 नोव्हेंबरला पुन्हा तुरुंगात परतण्याचे आदेशही नागपूर खंडपीठाने दिले आहेत.