नागपूर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim) हस्तक सलीम कुत्ता (Salim Kutta) याची सध्या जोरदार चर्चा आहे. सलीम कुत्ता प्रकरणात (Salim Kutta) भाजपकडून शिवसेना ठाकरे गटावर टीका केली जात असताना आता खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे सलीम कुट्टा प्रकरणात राजकीय वातावरण चांगलेच तापणार असल्याचे म्हटले जात आहे. आता मंत्री गिरीश महाजनांचे सलीम कुत्तासोबत संबंध असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते  एकनाथ खडसेंनी केली आहे. विधानपरिषदेत फोटो दाखवत मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी खडसेंनी केली आहे. 


सलीम कुत्ता यांच्याशी गिरीश महाजन यांचे संबंध आहेत. त्यामुळं यांच्यावर दहशतवाद विरोधी गुन्हे दाखल करावेत. ग्रामविकास मंत्री यांच्या भेटीचे फोटो समोर आले आहेत. जर बडगुजर यांचं नाव घेतलं जातं मग गिरीश महजन यांचं नाव का घ्यायचं नाही? गिरीश महाजन यांचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे. या प्रकरणी एसआयटी चौकशी स्थापन करण्याचें आदेश आपण तत्काळ उपसभापती निलम गोऱ्हे यांनी द्यावेत असे आम्हाला वाटतं. सरकारने तात्काळ कारवाई करावी. बॉम्ब स्फोटाशी सबंधित  गिरीश महाजन यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी खडसे यांनी केली आहे.  


गिरीश महाजनांचे सलीम कुत्तासोबतचे फोटो न दाखवण्याचे नीलम गोऱ्हेंचे निर्देश


एकनाथ खडसे यांच्या मागणीनंतर  विधानपरिषद सभापती नीलम गोऱ्हे यांनी  गिरीश महाजन यांचे सलीम कुत्ता सोबतचे फोटो   एकनाथ खडसेंन ते दाखवू नयेत असे निर्देश दिले आहे.  नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ खडसे यांनी मांडलेली 289 ची चर्चा फेटाळली.


अंबादास दानवे म्हणाले. एक लग्न 2017 साली झालं. इक्बाल कासकर यांची सून आले होते. या लग्नावर आयबीचे लक्ष होतं. सुधाकर बडगुजर यांचा सोबत बोलताना सलीम कुत्ता याचा फोटो व्हायरल झाला आहे. परंतु अशी माहिती मिळाली की, 1998 मध्ये सलीम कुत्ता याचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती एक आमदार एका पत्रकाराला विधीमंडळ परिसरात सांगत होता.  


मंत्र्यांचा उल्लेख करण्यात आला तो तात्काळ काढावा, शंभूराज देसाई यांची मागणी


ज्या व्यक्तीचे सभागृहात नाव घेण्यात आले. तो कुठेही जेवताना दिसत नाही. परंतु एका पक्षाचा महानगर प्रमुख हा नाचताना पाहिला मिळत आहे. विनाकारण या ठिकाणी एका मंत्र्यांचा उल्लेख करण्यात आला तो तात्काळ काढून यावा , अशी मागणी शंभूराजे देसाई यांनी केली आहे.