जालना : ओबीसी मेळाव्यातून (OBC Melava)  मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)  यांनी  मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange)  पाटलांवर दारु पिऊन किडन्या किडल्या अशी जहरी टीका भुजबळांनी केली आहे. भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेनी प्रत्युत्तर दिले आहे.   मी जन्मल्यापासून आतापर्यंत शरीराला दारू जरी शिवली असेल,तर मी जिवंत समाधी घेईल. माझी नार्को टेस्ट करा, असे मनोज जरांगे म्हणाले. उपोषण सोडताना जे ठरलं होतं ते उत्तर सरकारने प्रामाणिकपणे सभागृहात द्यावं आणि कायदा पारित करावा, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. 


मनोज जरांगे म्हणाले.  मी जन्मल्यापासून आतापर्यंत शरीराला दारू जरी शिवली असेल,तर मी जिवंत समाधी घेईल.  माझी नार्को टेस्ट करा ,आणि नाही आढळल्यास त्यांनी तरी समाधी घ्यावी. विरोध करणाऱ्यालाच माणूस बोलतो, म्हणून भुजबळला विरोध आहे. आमच्याकडेही त्यांची माहिती आहे.  मी जर काही सांगितलं तर ते सगळे सोडून हिमालयात जाईल. भुजबळांच्या दोन-तीन वाईट घटना मला पुराव्यासकट माहिती आहेत.


स्वतंत्र आरक्षण टिकतच नाही : मनोज जरांगे


सरकारने उपोषण सोडताना त्यावेळी ठरलेले प्रामाणिकपणे सभागृहात उत्तर देऊन कायदा पारित करावा, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. स्वतंत्र आरक्षण टिकतच नाही, स्वतंत्र म्हणजे नेमकं कसं हे स्पष्ट करा, असे देखील जरांगे म्हणाले. 


भुजबळांना गोळ्या सुरू कराव्यात ते बधीर झालंय : जरांगे


गिरीश महाजनांनी भुजबळांना समजावून सांगावं. त्यांना येरवाड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून गोळ्या सुरू कराव्यात. ते पागल आणि बधीर झालंय. गोरगरीब छोट्या छोट्या ओबीसी समाजातील जातींचा त्याला शाप लागलाय, असे जरांगे म्हणाले. 


आपआपसात तेढ निर्माण होईल असे  बोलू नये: गिरीश महाजन


 जरांगे आणि भुजबळ यांच्यात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांवर मंत्री गिरीश महाजन म्हणााले, मी दोन्ही नेत्यांना विनंती करणार आहे.आपआपसात तेढ निर्माण होईल असे कुणी बोलू नये. विषय दोन्ही कडून संपले पाहिजे संयम ठेवण्याची भूमिका घ्यावी 


 जाळपोळ करणाऱ्या समोर सरकार झुकतंय : छगन भुजबळ


सरकारचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगे यांच्या भेटीला गेलं होतं. त्यावर देखील छगन भुजबळांनी भाष्य केलं आहे. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, सरकार किती झुकणार जरांगेसमोर. त्याच्या पाया पडतायत, त्याला विनंती करतायत. सरकारला धमकी देणाऱ्यासमोर, जाळपोळ करणाऱ्या समोर तुम्ही झुकताय, असं म्हणत भुजबळांनी सरकारवर भाष्य केलं.