Girish Mahajan : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा पक्ष जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. पुढच्या आठ दिवसात बघा त्यांच्याकडे कोण राहणार कोण राहणार नाही असं मोठं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केलं आहे. संजय राऊत (sanjay Raut) संघटनात्मक बैठक घेऊन गेले. पण राऊतांच्या बोलण्यामुळं स्वतः उद्धव ठाकरे देखील परेशान असतील असे महाजन म्हणाले. पण आता तो विषय आऊट ऑफ कंट्रोल झाला आहे. त्यांच्या बडबडीमुळे हा पक्ष आता मी सांगू शकत नाही, पण पक्ष संपवण्यासाठी संजय राऊत पुरेसे आहेत असे महाजन म्हणाले. ते नाशिमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत यांच्याबद्दल उत्तर देण्यासाठी काही पुरेसे नाही. कोणता घोटाळा झाला काय झालं कोण अधिकारी असे महाजन म्हणाले. संजय राऊत यांना जास्त प्रसिद्धी आणि मनावर घेऊ नका असे महाजन म्हणाले. तुमची बडबड तुमचे विचार काय ते बघू निवडणुकीला सामोरे या त्यानंतर आपण भेटू असे महाजन म्हणाले.
ही पक्ष नेस्तानाभूत होतील
विवाह सोहळ्यामध्ये सर्व नेते एकत्र असतात. नाशिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक नेते सर्वपक्षीय नेते प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत असे महाजन म्हणाले. पुढे काय काय होतं, एका आठवड्यामध्ये बघा असे सूचक वक्तव्य महाजन यांनी केलं. एका आठवड्यामध्ये तुम्हाला चित्र स्पष्ट होईल. सगळे मोठे प्रवेश असतील, काही पक्ष नेस्तानाभूत होतील असेही महाजन म्हणाले.
मी कुंभमेळा मंत्री, माझ्यावर ही मोठी जबाबदारी
नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिले आहे. मी त्यावर काही वेगळं बोलू शकत नाही. मी कुंभमेळा मंत्री आहे, ही मोठी जबाबदारी आहे त्या संदर्भात काम सुरु आहे असे महाजन म्हणाले. कालच्या बैठकीसाठी फक्त मंत्री महोदयांना आमंत्रण होते. आमदार खासदार यांना आमंत्रण नव्हते. काही आमदार मुख्यमंत्री आले त्यामुळे उपस्थित होते असे महाजन म्हणाले.
दरम्यान, पहिल्यांदाच असं घडलं की 13 च्या 13 आखाड्याचे महंत बैठकीसाठी आले होते. सर्वांसोबत चर्चा करुन विनंती केली आणि सर्वांनी एकत्र येऊन बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. एका मताने सर्व ठराव पारित केल्याचे महाजन म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: