Nashik Crime : गेल्या काही दिवसांपासून नाशिक (Nashik News) शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आता नाशिक खुनाच्या घटनेने हादरले आहे. पंचवटी (Panchavati) परिसरातील पेठ रोडवरील (Peth Road) फुलेनगर येथील गौडवाडी परिसरात सोमवारी (दि. 2 जून) मध्यरात्रीच्या सुमारास खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. (Nashik Crime News)

ही घटना पंचवटी पोलीस ठाण्याच्या (Panchavati Police Station) हद्दीतील महापालिकेच्या 56 नंबर शाळेजवळील प्रवीण किराणा दुकानाजवळ घडली. मृताचे नाव संजय तुळशीराम सासे (40, रा. घर क्र. 1288, महालक्ष्मी चाळ, महाराणा प्रताप नगर, पेठ रोड, पंचवटी) असे आहे.

डोक्यावर वार करून हत्या

संजय सासे हे 'बाबागिरी' करत असल्याचा संशय होता, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. सोमवारी मध्यरात्री काही अज्ञात व्यक्तींनी संजय सासे यांच्या डोक्यावर गंभीर वार करून त्यांचा निर्घृण खून केला. या प्रकरणी संजय सासे यांची पत्नी रुपाली संजय सासे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून आतापर्यंत एका संशयित आरोपीला अटक केल्याची माहिती मिळत आहे.   

नाशिकमधील वाढती गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांसमोर मोठं आव्हान

दरम्यान, नाशिक शहरात सध्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र आहे. चोरी, खून, मारहाण, महिलांवरील अत्याचार, तसेच टोळीगिरीसारख्या गुन्ह्यांनी शहरात भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. सार्वजनिक ठिकाणी आणि रहिवासी भागात खुलेआम होणाऱ्या या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. पोलिस यंत्रणा गुन्हेगारांवर वचक ठेवण्याचा प्रयत्न करत असली, तरी गुन्हेगारी रोखण्यासाठी अधिक ठोस आणि प्रभावी उपाययोजना आवश्यक आहेत. वाढत्या गुन्हेगारीला रोखणे हे आता नाशिक पोलिसांसमोर (Nashik Crime) मोठं आव्हान ठरणार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Nashik Crime : वडिलांसोबत भाजीपाला आणायला गेला, किरकोळ पैशांवरून वाद उफाळला, 19 वर्षीय युवकाला धारधार शस्त्रानं वार करून संपवलं, नाशिकमधील घटना

आधी पाच लाख दिले, आता 25 लाख मागितले, दोरीनं बांधून मारलं अन् चटके दिले; सासरच्यांकडून नऊ वर्ष अमानुष छळ झालेल्या संभाजीनगरच्या विवाहितेनं सांगितली आपबिती