दारुच्या ब्रँडला महिलांचं नाव द्या, खप वाढेल : गिरीश महाजन
एबीपी माझा वेब टीम | 05 Nov 2017 01:57 PM (IST)
साखर कारखान्यानं निर्मित केलेल्या दारुच्या ब्रँडला महिलेचं नाव दिल्यास अधिक खप होईल, असं विधान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे.
नंदुरबार : साखर कारखान्यानं निर्मित केलेल्या दारुच्या ब्रँडला महिलेचं नाव दिल्यास अधिक खप होईल, असं विधान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. नंदुरबारमध्ये सातपुडा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. केवळ दारुच नव्हे, तर हल्ली तंबाखू उत्पादनानाही महिलांचीच नावं दिली जातात, असंही महाजन यांनी सांगितलं. अर्थात गिरीश महाजन यांनी हे विधान विनोदात केल्यामुळे जमलेल्यांमध्ये मोठा हशाही पिकला. तर काहींनी यावर नाराजीही व्यक्त केली. काय म्हणाले गिरीश महाजन?