Girish Mahajan : गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये सातत्याने इनकमिंग सुरु आहे. अनेक नेते पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. या पक्ष प्रवेशावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांची तोंडं बंद करा, त्यांना पक्षात घ्या, कुणाच्याही पक्ष प्रवेशाला विरोध करू नका, असा सल्ला महाजन यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. जळगावच्या जामनेरमध्ये पक्षाच्या जिल्हा कार्यशाळेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

Continues below advertisement

विरोधकांची तोंडं बंद करा, त्यांना पक्षात घ्या, महाजनांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला

मंत्री गिरीश महाजनांनी जळगावच्या जामनेरमध्ये पक्षाच्या जिल्हा कार्यशाळेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. विरोधकांची तोंडं बंद करा, त्यांना पक्षात घ्या, कुणाच्याही पक्ष प्रवेशाला विरोध करु नका, असा सल्ला यावेळी महाजन यांनी दिला. गिरीष महाजन हे भाजपचे बड नेते समजले जातात. ते भाजपचे संकटमोचक म्हणून देखील ओळखले जातात. त्यांच्या माध्यमातून अनेक नेत्यांनी यापूर्वी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, अशातच आज त्यांनी विरोधकांना आपलसं करुन घ्यावे असे सल्ला दिला आहे. विरोधकांची तोडं बंद करा आणि त्या पक्षात घ्या असा सल्ला त्यांनी दिली आहे. त्यामुळं आगामी काळात नेमका कोणाचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतच लढणार

आपण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतच लढणार आहोत. त्यामुळं एक सुद्धा जागा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाला मिळता कामा नये असे महाजन म्हणाले. विरोधकांचे तोडं बंद करायचे आहेत. त्यामुळं त्याला आपल्याकडे घ्यायचे आहे असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले. तो कसाही असूद्या पण कामाचा माणूस आहे असे महाजन म्हणाले. कितीतरी लोक आपल्यावर टीका करणारे होते पण  आज त आपल्याकडे आले असल्याचे गिरीश महाजन म्हणाले.  जो या पक्षामध्ये काम करेल त्याला पक्षात किंमत आहे. फक्त फोटोबाजी करणाऱ्याला किमंत नाही असेही महाजन म्हणाले. कार्यकर्ता छोटा जरी असला तरी त्याला पक्षात घ्या असा सल्ला महाजन यांनी दिला. त्याचे स्वागत करा असे ते म्हणाले. गिरीष महाजन हे भाजपचे बड नेते समजले जातात. ते भाजपचे संकटमोचक म्हणून देखील ओळखले जातात. त्यांच्या माध्यमातून अनेक नेत्यांनी यापूर्वी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

उद्धव ठाकरेंनी मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम केलं, डेड बॉडीमध्ये किती पैसे खाल्ले? महाजनांचा हल्लाबोल