Maharashtra Rain News : राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कुठं पाऊस तर कुठं उघडीप झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. तर काही भागात अतिवृष्टी देखील झाली आहे. यामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेती पिकांना देखील फटका बसला आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस राज्यात कसं असेल हवामान याबाबतची माहिती ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
अतिजोरदार पावसाची शक्यता
मान्सूनच्या सक्रियतेनंतर आजपासुन सुरु होणाऱ्या संपूर्ण आठवड्यात म्हणजे गुरुवार दिनांक 18 सप्टेंबर पर्यन्त महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार अश्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातही उद्या व परवा, म्हणजे रविवार व सोमवार दि.17 व 15सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता जाणवत आहे.
पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता
पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर म्हणजे मावळ मुळशी ताम्हिणी लोणावळा खंडाळा वेल्हे तसेच पोलादपूर महाबळेश्वर जावळी पाटण व लागतच्या परिसरात ह्या दोन दिवसात अत्याधिक पावसाची शक्यता जाणवते.
पाऊस तीव्रतेतील कमी अधिक फरक
16 सप्टेंबरपासून संपूर्ण मराठवाडा, खान्देश नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अश्या 18 जिल्ह्यात पावसाचा जोर (तीव्रता) पूर्णपणे नव्हे परंतु काहीसा कमी जाणवेल.
कोकण, विदर्भातील पावसाचे सातत्य
मुंबईसह संपूर्ण कोकण व विदर्भ अशा 18 जिल्ह्यात मात्र जोरदार पावसाचे सातत्य सध्या तरी आजपासुन पुढील 10 दिवस म्हणजे 22 सप्टेंबर पर्यन्त टिकून राहण्याची शक्यता जाणवते.
वेध परतीच्या पावसाचे
परतीच्या पावसाचे वेध जरी लागले असले तरी पावसाच्या इतर प्रणाल्यांचे अस्तित्व पाहता तो 15 सप्टेंबरच्या आसपास किंवा त्यानंतर परत फिरण्याची शक्यता आज जाणवते. वातावरणीय निरीक्षणा नंतरच त्याच्या तारखे संबंधी घोषणा होऊ शकते.
आज वाशिम जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळं जिल्ह्यात अनेक नदी नाल्यांना पूर आल्याचं चित्र होत आहे. मानोरा तालुक्यातील अरणावती नदीला मुसळधार पावसामुळं पूर आला आहे. नदीवरील पुलावरुन पाणी वाहू लागले आहे. त्यामुळं कोलार ते हिवरा, पारवा हा मार्ग बंद झाल्यानं वाहनधारकांसह शेतकरी अडचणींचा सामना करावा लागला. तसेच नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी घुसल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच चिखलागढ नदीला पूर आल्याने जवळपास 4 ते 5 गावाचा सम्पर्क तुटल्याच चित्र आहे.
महत्वाच्या बातम्या: