नाशिकमध्ये गुंगीचं औषध देऊन अल्पवयीन मुलीवर गँगरेप
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 05 Dec 2016 09:08 AM (IST)
नाशिक : गुंगीचं औषध देऊन एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका कॉलेज विद्यार्थ्यासह पाच अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महत्त्वाचं म्हणजे ही संबंधित मुलीसह सर्व आरोपी मुलं नाशिकमधील एका नामांकित इंग्लिश मीडियम शाळेत शिकतात. सप्टेंबर 2016 रोजी ही घटना घडली आहे. आरोपी मुलांपैकी एक मुलगा सिडको परिसरात राहतो. त्याच्या घरी नेऊन मुलीवर अत्याचार करण्यात आला. इतकंच नाही तर या प्रकाराची वाच्यता केल्यास चेहऱ्यावर अॅसिड फेकू, अशी धमकीही दिल्याने मुलगी घाबरली होती. मात्र संबंधित मुलीने रविवारी याबाबत घरी सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर रात्री उशिरा अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आरोपी मुलांना ताब्यात घेतलं.