रेल्वे तिकिटावर सवलतीसाठी ज्येष्ठ नागरिकांना आता आधार कार्ड बंधनकारक, 1 एप्रिलपासून नियम लागू होणार, रेल्वे काऊंटर आणि ई-बुकिंग अशा दोन्ही ठिकाणी आधार कार्ड बंधनकारक असेल


मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूसंदर्भातील याचिकेवर हायकोर्टात सुनावणी, साक्षीसाठी संजय राऊतांची हायकोर्टात हजेरी

--------------

जयललिता यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक : अपोलो हॉस्पिटल

--------------

विरोधी पक्षाचा स्थगन प्रस्ताव फेटाळला,विरोधकांची घोषणाबाजी, सभागृहाचं कामकाज 15 मि.साठी स्थगित

--------------

नोटाबंदीचं राजकीय भांडवल करू नये. हा लोकांचा प्रश्न आहे. काळ्या पैशाचा गोवर्धन सर्वांनी उचलला पाहीजे - सुधीर मुनगंटीवार

--------------

नोटाबंदी निर्णयानंतर काही त्रुटी समोर आल्या हे खरे आहे, पण निर्णय खूप मोठा आहे : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

--------------

जिल्हा बॅंकांवर जे निर्बंध आहेत त्यावर तोडगा काढण्यासाठी आरबीआयच्या एमडीची बैठक बोलवा - जयंत पाटील, शेकाप

--------------

देशातलं उत्पादन ठप्प झालंय. प्रगती खुंटली, जनता त्रस्त आहे : नारायण राणे

--------------

मोदी म्हणतात 94% लोक माझ्या मागे आहेत. पण हेे खरं नाही. चा प्रयोग 7 देशांनी केेला पण त्या देशाची प्रगती थांबली: राणे

--------------

नागपूर : नोटाबंदीमुळे सामान्यांना होणाऱ्या त्रासावर विधानपरिषदेत विरोधी पक्षाचा स्थगन प्रस्ताव

--------------

रायगड : रोहामधील धाटाव एमआयडीसीतील कोरस कंपनीत अपघात, सेंट्रिफ्यूल मशीन तुटल्यामुळे एका कामगाराचा मृत्यू, तर एक कामगार गंभीर जखमी

--------------

पुणे : सहकारी बँक कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला सुरुवात, आरबीआयच्या निर्बंधांचा निषेध करत, आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा

--------------

कार आणि बसच्या अपघातात उस्मानाबादचे नूतन नगरसेवक बंटी मंजुळे यांचा मृत्यू

--------------

कर्नाटकमधून तामिळनाडूमध्ये जाणाऱ्या बस सेवा रद्द, तामिळनाडूमध्ये दगडफेकीच्या घटनेनंतर कर्नाटक सरकारचा निर्णय

--------------

वाराणसी : भारतरत्न उस्ताद बिस्मिला खां यांच्या सनई चोरीला, घरातून चांदीच्या पाच सनईंची चोरी झाल्याचा कुटुंबियांचा दावा

--------------

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दोन अपघात, पाच जण गंभीर, तर 15-20 जण किरकोळ जखमी, जखमींवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु

--------------

1. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना हृदयविकाराचा झटका, चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलबाहेर समर्थकांची गर्दी, हॉस्पिटलमध्येच पार पडली कॅबिनेटची बैठक

--------------

2. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये कॉर्टूनवाद

--------------

3. पुण्यात नोटबंदीच्या समर्थनार्थ देशातील पहिला मोर्चा, राज्यसभेचे खासदार काकडेंच्या नेतृत्वात नोटबंदीचे समर्थक एकवटले, मोर्चाला हजारोंची उपस्थिती

--------------

4. मुंबईतल्या सय्यद कुटुंबाकडून तब्बल 2 लाख कोटींची काळी संपत्ती घोषित, आयकर विभाग गुन्हे दाखल करणार, खजिन्याचा धनी दुसराच असल्याचा संशय

--------------

5.नितीन गडकरींच्या मुलीच्या लग्नानिमित्त संघ मुख्यालयात नेत्यांची वर्दळ, उद्धव, राजनाथ सरसंघचालकांना भेटले, भागवतांसोबत तासभर चर्चा

--------------

6. 'हार्ट ऑफ एशिया'च्या व्यासपीठावरून नरेंद्र मोदींचे पाकिस्तानला खडेबोल, दहशतवादाच्या मुद्यावर अफगाणिस्तानचंही पाकवर टीकास्त्र

--------------

7. पंजाबच्या भटिंडामध्ये लग्न समारंभात गोळीबार, लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान डान्सरची हत्या, घटनेनंतर आरोपी फरार

--------------

एबीपी माझा वेब टीम