नागपूर : राज्याची उपराजधानी नागपुरात आमदार निवासात झालेल्या बलात्काराची घटना ताजी असतानाच आणखी एका तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नागपूरच्या सदर भागातील महिला सुधारगृहातून पळालेल्या चार मुलींपैकी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला.

नागपूरच्या सदर भागातील महिला सुधारगृहातून 20 एप्रिल रोजी चार मुलींनी पळ काढला होता. त्यातील एका अल्पवयीन मुलीवर सुगत नगरमधल्या पडक्या इमारतीत सामूहिक बलात्कार करण्यात आला. शुक्रवारी ही घटना घडली.

पळालेल्या चार पैकी तीन मुली वेगळ्या ठिकाणी गेल्या आणि पीडित मुलगी एकटी सीताबर्डी परिसरात भटकत राहिली. त्यावेळी त्याच भागातल्या तीन फेरीवाले आणि एका रिक्षा चालकाने दुष्कृत्य केलं.

बलात्कारानंतर पीडित मुलीला दुसऱ्या दिवशी सीताबर्डी परिसरात आणून सोडलं. तेव्हा स्थानिकांनी तिला पोलिस स्टेशनमधे नेऊन सोडलं. त्यानंतर पीडितेने महिला सुधारगृहाच्या अधिक्षिकेला बोलावलं आणि सगळा प्रकार सांगितला.

या प्रकरणी सीताबर्डी पोलीस स्टेशनमधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय चार जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र पळालेल्या इतर तीन मुली अजूनही बेपत्ता आहेत.

नागपूरच्या आमदार निवासात सामूहिक बलात्कार

नागपूरच्या आमदार निवासच्या रूम नंबर 320 एकमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली.

पीडित मुलगी एका ज्वेलर्सच्या दुकानात काम करत होती. त्याच दुकानाच्या मालकानं या मुलीवर बलात्कार केला आहे. घरातून भोपाळला कुटुंबासोबत फिरायला जातोय म्हणत दुकानदारानं मुलीला फूस लावली आणि चार दिवस आमदार निवासात बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याप्रकरणी ज्वेलर्स मालक मनोज भगत आणि रजत मदरे या दोघांना अटक केली आहे.

संबंधित बातम्या

नागपूरच्या आमदार निवासात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार


नागपूरच्या आमदार निवासातील गँगरेपबाबत धक्कादायक माहिती


नागपूर आमदार निवासाचे नियम कडक, ‘माझा’च्या बातमीनंतर प्रशासनाला जाग