Ganesh Visarjan 2021 LIVE: पुढच्या वर्षी लवकर या...! आज गणपती बाप्पाला निरोप, पाहा लाईव्ह अपडेट्स
Ganesh Visarjan : दहा दिवस मुक्काम केल्यानंतर आज गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे. आज कोरोनाचे नियम पाळत अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचं वाजत गाजत विसर्जन केलं जाणार आहे.
पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नदीत विनापरवाना विसर्जन करायला आलेल्यांपैकी दोघे बुडाले आहेत. दोघे ही एकमेकांचे नातेवाईकच आहेत. मोशीत ही घटना सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. दत्ता ठोंबरे आणि प्रज्वल काळे अशी दोघांची नावं असून त्यांचा शोध सुरू आहे. अग्निशमन दल घटनास्थळी पोहचत आहे.
नाशिकच्या विसर्जन मिरवणुकीत मानाच्या तिसऱ्या गुलालवाडी व्यायामशाळेच्या गणपती बाप्पाला भावपूर्ण वातावरणात संध्याकाळी निरोप देण्यात आला. यावेळी मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाचे यंदाचे 96 वे वर्ष आहे, लेझीम आणि ढोल पथकामुळे गुलालवाडी व्यायामशाळेची मिरवणूक ही नाशिकमध्ये मुख्य आकर्षण ठरत असते मात्र गेल्या वर्षीपासून कोरोच्या सावटामुळे मिरवणूकीला परवानगी नसल्याने साध्या पद्धतीने मंडळासमोरच गणेशाचे विसर्जन करण्यात येते आहे.
औरंगाबाद महानगरपालिकाने शहरातील 12 ठिकाणी घरगुती तसेच सार्वजनिक गणपती मंडळाच्या मूर्तींचे विसर्जन करण्याची व्यवस्था केली आहे .या ठिकाणी घरगुती गणेशाचे विसर्जन होत आहे. दहा दिवस गणपतीची श्रद्धापूर्वक पूजा केल्यानंतर आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातो आहे
पुण्यातील मानाचा पहिला गणपती कसबा गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
अभिनेता अभिजीत खांडकेकरने सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करत आज सकाळी घरीच आपल्या घरगुती बाप्पाचे विसर्जन केले..
अभिनेता अभिजीत खांडकेकरने सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करत आज सकाळी घरीच आपल्या घरगुती बाप्पाचे विसर्जन केले..
आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाच्या विसर्जनासाठी हिंगोली नगर परिषद सज्ज झाली असून गणेश विसर्जन कुंड माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरात एकूण सहा कृत्रिम तलावांची निर्मिती हिंगोली नगर परिषद च्या वतीने करण्यात आली तर ज्या ठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण करणे शक्य नाही अशा ठिकाणी दोन फिरते कृत्रिम तलावांची निर्मिती हिंगोली नगर परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे या कृत्रिम तलावात प्रत्येकी तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून सामान्य हिंगोलीकर यांना बाप्पाचे विसर्जन हे थेट दारातच करता यावं या उद्देशातून ह्या संपूर्ण संकल्पना आहे ती निर्माण करण्यात आली आहे
औरंगाबादेत वर्षानुवर्षे गणपती विसर्जनाची प्रथा जोपासली जाते .औरंगाबाद शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपती विसर्जन मिरवणूक सुरू झाल्याशिवाय सार्वजनिक मंडळ मिरवणूक काढत नाहीत.आज सकाळी संस्थान गणपतीची विधिवत पूजा करण्यात आली अथर्वशीर्ष पठाण झालं .काही वेळात सार्वजनिक आरती होईल .या वर्षी कोरोनाच्या नियमावली नुसार संस्थान गणपतीची विसर्जन मिरवणूक निघणार नाही .जागेवरच विसर्जन करण्यात येणार आहे ...
दहा दिवसांपूर्वी वाजत गाजत घरोघरी विराजमान झालेल्या बाप्पाला आज भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जातोय. नाशिकमध्ये पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर अनेकांचा भर दिसत असतांनाच आज सकाळपासूनच घरगुती गणपती विसर्जनसाठी गणेश मूर्ति संकलन केंद्रावर गणेशभक्त दाखल होतायत. बाप्पाची मनोभावे आरती करत कृत्रिम तलावात डुबकी देत मूर्ति दान केल्या जातायत.
कोल्हापूरच्या मानाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन
कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते बाप्पाचं विसर्जन
तुकाराम माळी तालीम मंडळाकडून बाप्पाचं विसर्जन
प्रतिष्ठापना केलेल्या ठिकाणापासून 100 मीटरवर कृत्रिम कुंडात बाप्पाचं विसर्जन
पुण्यातील प्रसिद्ध भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा मंडळाकडून देखील मंडपाच्या जवळच विसर्जन हौद तयार करण्यात आलेला आहे सुंदर असे फुलांनी सजलेले हे विसर्जन हाऊस मध्ये बाप्पांचे विसर्जन होणार आहे.. काही भक्तांकडून बाप्पांच्या मंदिरा समोर सुंदर रांगोळी काढता रांगोळीच्या पायघड्या घालत आहेत.. सगळ्या निर्बंधांचा पालन करत यंदाच्या वर्षीही बाप्पांना निरोप दिला जातोय...
नागपूरचा राजाची मूर्ती विसर्जनासाठी काढण्यात आली आहे... तुळशीबाग परिसरात जयस्वाल कुटुंबियांच्या प्रांगणात स्थापन करण्यात आलेली 4 फुटी मूर्तीचे आज नागपूर जवळच्या कोराडी या ठिकाणी विसर्जन केले जाणार आहे...
दरवर्षी नागपूरच्या राजा ची विसर्जनाची मिरवणूक नागपूरकरांसाठी आकर्षणाचा केंद्र असते... घोडे, उंट आणि अनेक बॅंड पथकांचा समावेश असलेली लांबच लांब मिरवणूक पाहण्यासाठी नागपूरकर तुळशीबाग परिसरासह ज्या ज्या भागातून ही विसर्जन मिरवणूक जाते त्या त्या ठिकाणी गर्दी करतात....
मात्र यंदा कोरोनामुळे विसर्जन मिरवणुकीवर बंदी आहे.. त्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीने बाप्पांचा विसर्जन केलं जाणार आहे..
मंडपातून मूर्ती बाहेर काढून एका छोट्या ट्रक वर बसविण्यात आली आणि ती कोराडी च्या दिशेने विसर्जनासाठी नेण्यात आली आहे
मनपाच्या मूर्ती संकलन गाडीने एकाला चिरडले
- गोदा घाटावरील घटना
-
गोदावरी किनाऱ्यावर झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर गेली गाडी
- गंभीर जखमीला जिल्हा रुग्णालयात केले दाखल
-घटनेनंतर चालक फरार, वाहन पंचवटी पोलिसांनी घेतले ताब्यात
- अपघातानंतर जखमी बऱ्याच वेळ घटनास्थळी पडून
-जखमींची ओळख पटली नाही
-गणेश मूर्ती संकलनासाठी महापालिका नेमली वाहन
पोलीस घटनास्थळी दाखल
गणेश विसर्जनाला सकाळीच लागले गालबोट
गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाचं थाटामाटात आगमन झाल्यानंतर आता आज गणपती बाप्पाला निरोप देण्याचा दिवस आला आहे. यासाठी मुंबई महानगरपालिकेने देखील जय्यत तयारी केली आहे. मुंबईतील जी उत्तर विभागात पालिकेच्या वतीने 6 तलाव तयार केले आहेत. यंदा देखील कोरोना मूळे सर्वसामान्यांना कृत्रिम तलावाजवळ येऊन बाप्पाचं विसर्जन करता येणार नाही. याठिकाणी पालिकेच्या वतीने जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. एकट्या जी उत्तर विभागात ठिकठिकाणी 70 जीवरक्षक बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी उपस्थित असणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा कोणत्याही प्रकारे गर्दी होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तगडा तैनात करण्यात आला आहे
अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने कोल्हापूर शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे...शहरातील कोणत्याही गणेशोत्सव मंडळाला विसर्जन मिरवणूक काढण्यास परवानगी दिली नाही... नागरिकांनी गर्दी करून कोरोनाचे संकट वाढू नये याच्यासाठी कोल्हापूर शहरातील प्रत्येक चौकात अशा पद्धतीने पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे...साधारण अडीच हजार पोलीस संपूर्ण शहरात तनात करण्यात आले आहेत.
पार्श्वभूमी
Ganesh Visarjan : दहा दिवस मुक्काम केल्यानंतर आज गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे. आज कोरोनाचे नियम पाळत अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचं वाजत गाजत विसर्जन केलं जाणार आहे. पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पाला निरोप दिला जातो. मात्र कोविडच्या नियमांमुळं यंदाही विसर्जन मिरवणुकीचा उत्सव गर्दी टाळूनच केला जाणार आहे.
Ganesh Visarjan 2021 : गणेश विसर्जनासाठीच्या मुंबई महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी
आज गणेशोत्सवाची सांगता करत गणपती मूर्तींचे पाण्यात विसर्जन केले जाते. चतुर्थीला घरोघरी लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होऊन पूजन केले जाते. पुढील 1 दिवस गणेशाचे यथासांग मनोभावे पूजन केले जाते. यानंतर अनंत चतुर्दशीला गणपती मूर्तींचे योग्य मुहुर्तावर विसर्जन केले जाते.
आज 19 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन केले जाईल. काही ठिकाणी दीड दिवस, पाच दिवस, तर काही ठिकाणी सात दिवस गणपती पूजन केले जाते. तर, अनेक ठिकाणी संपूर्ण 10 दिवस गणपतीची सेवा केल्यानंतर अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाला निरोप दिला जातो.
गणपती विसर्जन समुद्र, नदी, तलाव, कुंडामध्ये केले जाते. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यंदाही विसर्जन मिरवणुकीला गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे सर्वांची सुरक्षितता लक्षात घेऊन शक्य असल्यास घरच्या घरी गणपती मूर्तीचे विसर्जन करावे, असंही प्रशासनानं सांगितलं आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनाही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
अनंत चतुर्दशी तिथी प्रारंभ : 19 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 5 वाजून 59 मिनिटे
अनंत चतुर्दशी तिथी समाप्ती : 20 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 5 वाजून 28 मिनिटे.
गणेश विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने मुंबईत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. वैभवशाली गणपती विसर्जन मिरवणूक यंदाही कोविडच्या परिस्थितीत होणार नाही. यासाठी गणेश विसर्जनासाठीच्या मुंबई महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. पुण्यात देखील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका नाहीत. तर विसर्जनाच्या पार्श्वभूमिवर बंदोबस्तासाठी पोलिस प्रशासन सज्ज आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -