Ganesh Visarjan 2020 | कोरोनामुळे यंदा बाप्पाला साधेपणाने निरोप!
Ganesh Visarjan 2020 | दरवर्षी ढोल ताशाच्या गजरात, वाजतगाजत गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. पण यंदा कोरोनामुळे अत्यंत साधेपणाने गणरायाला निरोप दिला जाणार आहे.
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Sep 2020 04:14 PM
पार्श्वभूमी
मुंबई : आज अनंत चतुर्दशी. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याचा दिवस. दरवर्षी ढोल ताशाच्या गजरात, वाजतगाजत गणपती बाप्पाला निरोप दिला जातो....More
मुंबई : आज अनंत चतुर्दशी. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याचा दिवस. दरवर्षी ढोल ताशाच्या गजरात, वाजतगाजत गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. पण यंदा कोरोनामुळे अत्यंत साधेपणाने गणरायाला निरोप दिला जाईल. अनंत चतुर्दशीला मुंबईतील माहौल कसा असतो, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पण यावर्षी मुंबईचा राजा, लालबागचा राजा किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचं निर्णय घेतला आहे. परिणामी पण यंदाचं चित्र पूर्णत: वेगळं आहे. तर पुण्यातील गणेशोत्सवाची ख्यातीही देशभरात आहे, कोरोना संकटात इथेही साधेपणा विसर्जन सोहळा पार पडणार आहे. मानाच्या गणपतीचं मंडपातच विसर्जन होणार आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
गणेश विसर्जन करण्यासाठी गेल्या लष्करी जवानांचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील वखारी गावातील घटना घडली.
विहिरीत तोल जाऊन पडल्याने जवानांचा मृत्यू झाला आहे. प्रशांत गुंजाळ असे लष्करी जवानांचे नाव असून अरुणाचल प्रदेशात लष्करी सेवेत होते.
दोन महिन्याची सुट्टी घेऊन घरी आले होते.
विहिरीत तोल जाऊन पडल्याने जवानांचा मृत्यू झाला आहे. प्रशांत गुंजाळ असे लष्करी जवानांचे नाव असून अरुणाचल प्रदेशात लष्करी सेवेत होते.
दोन महिन्याची सुट्टी घेऊन घरी आले होते.