Ganesh Naik on  Eknath Shinde :  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली, पण कमवलेलं टिकवता आलं पाहिजे असा टोला राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी लगावला. पालघरमधील दुर्वेश येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी गणेश नाईक बोलत होते. लॉटरी प्रत्येकाला लागत नाही. मात्र, लागलेल्याने ती योग्य टिकवली पाहिजे, असं सांगत गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला.

Continues below advertisement


प्रत्येकाचे नशीब आहे. एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली आनंदीची गोष्ट असल्याचे गणेश नाईक म्हणाले. पण कमवलेलं टिकवता आलं पाहिजे. किती कमवलं आणि कसं कमवलं आणि किती टिकवलं हे महत्वाचं असल्याचे गणेश नाईक म्हणाले. यावर्षी 10 कोटी झालं लावण्याचे उद्दीष्ट असल्याचे गणेश नाईक म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या: