रत्नागिरी : मुंबईसह राज्यभरात गणपती बाप्पाचं जल्लोषात आगमन होत आहे. त्याचबरोबर कोकणातही गणरायाचं पारंपारिक पद्धतीने स्वागत होत आहे. कोकणातील गावागावात गणराजाच्या आगमनाचा जल्लोष पाहायला मिळत आहे.

 

एकट्या रत्नागिरी जिल्हयात 1 लाख 60 हजारहून अधिक घरांमध्ये गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे.

 

कोकणात गणेश मूर्ती डोक्यावरुन आणण्याची परंपरा आहे. गावाच्या वाडीतील सगळी मंडळी एकत्र येतात आणि आपापल्या घरातील गणेशमूर्ती डोक्यावरुन आणतात. कोकणातील घर ही डोंगरावर असतात, यामुळेच शेताच्या बांधावरुन एका रांगेत वाजत गाजत या गणेश मूर्ती आणल्या जातात.

 

पुढील दहा दिवस संपूर्ण कोकणातील वातावरण भारावलेले असेल. कोकणात दाखल झालेला चाकरमानी आपल्या गावाच्या सग्यासोयऱ्याबरोबर गणेशोउत्सव जल्ल्लोषात साजरा करत आहे.