Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यातील मोसम या गावात झालेल्या वाघीण शिकार प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तर एक आरोपी अद्याप फरार आहे. वनविभाग या आरोपीचा शोध घेत आहेत. वाघिणीच्या शिकाराची माहिती मिळताच वनविभागाने तातडीने कारवाई सुरु केली. अवघ्या 24 तासांत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तर इतर एका आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपींनी वाघिणीची शिकार करुन गावालगतच पुरलं होतंस अशी माहिती मिळाली आहे. 


गडचिरोली जिल्ह्यातील मोसम गावात झालेल्या वाघीण शिकार प्रकरणी दोन आरोपी अटकेत तर एक फरार आहे. आलापल्ली वनक्षेत्रातील मोसम गावालगत वाघिणीची शिकार करून शव जमिनीत पुरण्यात आले. वाघिणीच्या मृतदेहाचे अवयव देखील बेपत्ता आहेत. वनविभागाने 24 तासांत आरोपींचा माग काढत 3 पैकी 2 आरोपींना अटक केली आहे. राकेश नावाचा एक आरोपी वनविभागाच्या तावडीतून फरार झाला आहे. आरोपींकडून काही नखे, मिशा व अन्य अवयव जप्त करण्यात आले आहे.  मुख्य आरोपी राकेश तेलंगणात फरार झाल्याचा संशय आहे.  मुख्य वनसंरक्षक वन्यजीव सुनील लिमये यांनी दौरा करत धक्कादायक घटनेचा आढावा घेतला होता. आरोपीच्या शोधासाठी वनविभागाने तीन स्वतंत्र पथके गठीत केली आहेत. 


गडचिरोली जिल्ह्यातील मोसम गावात झालेल्या वाघीण शिकार प्रकरणी दोन आरोपीना अटके करण्यात आली आहे. तर एक आरोपी फरार झालाय. आरोपींनी आलापल्ली वनक्षेत्रातील मोसम गावालगत वाघिणीची शिकार करून तिचे शव जमिनीत पुरले. गस्ती पथकाला नाल्यात संशयास्पद वाटल्याने जमीन खोदल्यावर घटना उघडकीस आली. प्राथमिक तपासात वाघिणीच्या मृतदेहाचे अवयव देखील बेपत्ता होते. वनविभागाने 24 तासात आरोपींचा माग काढत 3 पैकी 2 आरोपीना अटक केली आहे. रघु गेडाम 56, राकेश गेडाम 25,  लक्ष्मण वेलादी 38 अशी आरोपींची नावे आहेत. यातील राकेश नावाचा एक आरोपी वनविभागाच्या तावडीतून फरार झालाय. अटकेतील आरोपींकडून काही नखे, मिशा व अन्य अवयव जप्त झाले आहेत. मुख्य आरोपी राकेश तेलंगणात फरार झाल्याचा संशय आहे. राज्याचे मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी घटनास्थळी दौरा करत या धक्कादायक घटनेचा आढावा घेतला. आरोपीच्या शोधासाठी वनविभागाने 3 स्वतंत्र पथके गठीत केली आहेत.