सुट्ट्या पैशांच्या अभावामुळे साईभक्तांना मोफत जेवण
एबीपी माझा वेब टीम | 09 Nov 2016 01:36 PM (IST)
शिर्डी : सुट्ट्या पैशांच्या अभावामुळे साईभक्तांना मोफत जेवण मिळणार आहे. हजार, पाचशेच्या नोटा बंद झाल्याने भक्तांची अडचण टाळण्यासाठी संस्थानने हा निर्णय घेतला आहे. दर्शनरांगेत चहा, नाष्टा, लाडू, प्रसादाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. संस्थानकडून भक्तनिवासातही भक्तांची अडचण न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर डोनेशन काऊंटरवर हजार, पाचशेच्या नोटा घेणे बंद करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून हजार आणि पाचशेच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहिर केला. त्यानतंर आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे. मात्र अचानक हा निर्णय जाहिर करण्यात आल्यामुळे अनेकांची गैरसोय देखील होत आहे. पेट्रोल पंप, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, एअरपोर्ट, सरकारी रुग्णालये या ठिकाणी 11 नोव्हेंबरपर्यंत सध्या जुन्या नोटा स्वीकारल्या जात आहेत. मात्र तरीही सुट्ट्या पैशांच्या अभावामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.