मुंबई : केंद्राच्या नोटा बदलण्याच्या निर्णयानंतर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला अर्थसचिव, अर्थ विभागाचे अधिकारी, आरबीआयचे प्रतिनिधी उपस्थित असतील.


आज दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे. केंद्राने नोटा बदलण्याचा निर्णय घेतल्यानंतर गैरसोय टाळण्यासाठीच्या नियोजनाविषयी या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

काळ्या पैशाविरोधातील लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठं शस्त्र उगारलं आहे. पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे. मंगळवार (8 नोव्हेंबर 2016) च्या मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्दबातल करण्यात आल्या आहेत.

देशभरात आज म्हणजेच 9 नोव्हेंबर रोजी सर्व एटीएम बंद राहणार आहेत. तर 10 तारखेलाही काही ठिकाणी एटीएम बंद राहतील. एक हजार आणि पाचशेच्या नोटा रद्द झाल्या आहेत, मात्र 100 रुपये, 50 रुपये, 20 रुपये, 10 रुपये, 5 रुपये, 2 रुपये आणि 1 रुपयाची नोट तसंच दहा, पाच, दोन आणि एक रुपयाची नाणी चलनात असतील.

संबंधित बातमी :

पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बदलून घेण्यासाठी काय कराल?


500 आणि 100 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द