पोलीसच पोलीसाच्या मदतीला येत नसल्याचे समोर आले आहे. रेल्वे पोलीस दलात काम करणारे आनंद चव्हाण यांचे पैसे काढून देण्यात शिवसेनेच्या नितीन नांदगावकर यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. आपल्याला पोलिसांकडून न्याय न मिळता शिवसेनेकडे न्याय मिळाल्याचे आनंद चव्हाण यांनी जाहीररित्या सोशल मिडीयावर सांगितले आहे.


आनंद चव्हाण यांनी पनवेल येथे 2018 रोजी घर बुकींग करण्यासाठी एजंट राज दुबेला 6 लाख 58 हजार रूपये दिले होते. तसेच 45 लाखाचा 1 बीएचके रूम बुक करण्यात आला होता. उरलेले पैसे बॅंकेत लोन करून द्यायचे होते. मात्र, बॅंकेत लोन करण्यासाठी गेलेल्या आनंद चव्हाण यांना यश आलं नाही. यानंतर राज दुबेला दिलेले पैसे आनंद चव्हाण यांनी परत मागितले. मात्र, त्याने देण्यास नकार दिला. आनंद चव्हाण यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात सप्टेंबर 2019 मध्ये धाव घेतली. राज दुबे विरोधात पोलीस कारवाई करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी दाद दिली नाही. अनेक वेळा पाठपुरावा करूनही पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. याउलट आनंद यांना दिवाणी न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. 


पोलिसांकडून न्याय मिळत नसल्यानं घेतली नितीन नांदगांवकरांची मदत
एजंट राज दुबेला दिलेले 6 लाख 58 हजार परत मिळत नसल्याने नैराश्यात आलेल्या आनंद चव्हाण यांनी नितीन नांदगांवकर यांची भेट घेतली. 2020 दिवाळी मध्ये नितीन नांदगांवकर यांनी आनंद चव्हाण यांना शिवसेना भवनमध्ये भेटण्यास बोलावले. यावेळी त्यांना मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून तक्रार करण्यास सांगितले. यानंतर नितीन नांदगांवकर यांनी राज दुबेला फोन करून आनंद यांचे घेतलेले पैसे परत देण्यास सांगितले. नांदगावकर यांचा फोन आल्याने राजदुबेने आनंद चव्हाण यांना फोन करून शिवीगाळ करीत कुणालाही मध्यस्थी करायला लावली तरी पैसे मिळणार नसल्याचे सांगितले.


नितीन नांदगांवकरांचा एजंटला सज्जद दम
नितीन नांदगावकर यांनी दुबेला सज्जड दम दिला असता त्यानं पैसै परत करण्यास सुरवात केली. त्यानंतर आठवड्याभरातच दुबेने आनंद यांना 50 हजार परत केले. त्यानंतर काही दिवसांनी 90 हजार दिले. असे थोडे अधिक करून 2021 पर्यंत 5 लाख 93 हजार परत केले. अखेर राहिलेले 65 हजारही काल परत केल्यान आनंद चव्हाण यांनी नितीन नांदगावकर  आणि शिवसेनेचे जाहिर सोशल मिडीयातून आभार मानले आहेत. एकीकडे पोलीसांकडे वारंवार दाद मागूनही आपले पैसे परत मिळाले नाहीत. मात्र, दुसरीकडे नितीन नांदगांवकर यांनी ते काढून दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha