पालघरच्या केळवे समुद्रात चार पर्यटक बुडाले!
संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर | 17 Jun 2018 05:09 PM (IST)
समुद्राला भरती असताना पर्यटक पाण्यात उतरल्याने ही दुर्घटना घडली, अशी प्राथमिक माहिती मिळते आहे.
पालघर : केळवे येथे पर्यटनासाठी आलेले चार पर्यटक सुमद्रात बुडाल्याची घटना घडली आहे. हे पर्यटक नालासोपारा येथील होते. दुपारी दोन-अडीच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बुडालेल्या चौघांपैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून, तिघांचा शोध सुरु आहे. समुद्राला भरती असताना पर्यटक पाण्यात उतरल्याने ही दुर्घटना घडली, अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. तीन जूनला रत्नागिरीत दुर्घटना मुंबईतल्या पाच जणांचा तीन जून रोजी रत्नागिरीतील आरेवारे समुद्र किनाऱ्यावर बुडून मृत्यू झाला होता. पर्यटनासाठी गेलेल्या बोरीवलीतील डिसुजा कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू झाला. संबंधित बातम्या : मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर अतिउत्साही पर्यटकांचं जीवघेणं धाडस मुंबईतल्या पाच पर्यटकांचा रत्नागिरीच्या समुद्रात बुडून मृत्यू