इंदापूर : सुट्टीनिमित्त गावी फिरायला आलेले चार डॉक्टर भीमा नदिच्या उजनी बॅक वॉटरमध्ये बुडाल्याची घटना घडली आहे. दहा डॉक्टर बोटीतून प्रवास करत होते. त्यापैकी चार जण बुडाले, तर उर्वरित सहा जण पोहून बाहेर निघाले.

इंदापूर तालुक्यातील अजोती गावातील ही घटना आहे. बुडालेल्या चार जणांपैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. तर उर्वरित तीन जणांचा शोध सुरु आहे.

डॉ. सुभाष मांजरेकर (अकलूज), डॉ.महेश लवटे (नातेपुते), डॉ. अण्णासाहेब शिंदे, डॉ. उराडे (नातपुते) हे चार डॉक्टर पाण्यात बुडाले आहेत. डॉ. उराडे यांचा मृतदेह मिळाला आहे.

डॉ.  प्रवीण श्रीरंग पाटील (माळशिरस), डॉ. दत्तात्रय भगवान सर्चे (माळशिरस), डॉ. अतुल विनोदकुमार दोशी (अकलूज), डॉ. श्रीकांत नंदकुमार देवडेकर (अकलूज), डॉ. समीर अशोक दोशी (अकलूज), डॉ. दिलीप तुळशीराम वाघमोडे  (माळशिरस) या सहा डॉक्टरांना पाण्यातून बाहेर पडण्यात यश आलं.