जळगावातल्या चिखली गावात पायी जाणाऱ्या चौघांना टँकरनं चिरडलं
चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव | 19 Nov 2017 05:48 PM (IST)
मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली गावाजवळ पायी जाणाऱ्या चौघांना टँकरने चिरडलं. मृतांमध्ये 13 महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे.
फाईल फोटो
जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली गावाजवळ पायी जाणाऱ्या चौघांना टँकरने चिरडलं. मृतांमध्ये 13 महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घोडसगाव येथून गोधन पवार यांचं कुटुंब चिखली गावाकडे जात होतं. यातील गोधन व त्यांचा मुलगा सायकलीवर तर अन्य पाच जण पायी जात होते. यावेळी मुक्ताईनगरहून मलकापूरकडे जाणारा भरधाव टँकरने चौघांना जोरदार धडक दिली. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला. यात अमरसिंग गोधन पवार (१३ महिने), निम्मीबाई गोधन पवार (३८), अल्कोस पवार (आठ), उड्डीया गोधन पवार (६) हे जागीच ठार झाले. तर टँकरचा जोरदार धडकेने निहाल गोधन पवार हा गंभीर जखमी झाला आहे. अपघातातून गोधन व नेहा बाई हे दोघे बचावले आहेत. अपघातानंतर टँकर चालक पसार झाला आहे.