17th May In History: आजचा दिवस मराठ्यांच्या इतिहासात महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी पहिल्या अँग्लो- मराठा युद्धाचा शेवट झाला. मराठा आणि ईस्ट इंड्या कंपनीमध्ये सालबाईचा तह झाला. त्याचसोबत देवीची लस शोधून काढणाऱ्या डॉ. एडवर्ड जेन्नर यांचा जन्मही आजचाच. जाणून घेऊया इतर महत्त्वाच्या घडामोडी


1792 : न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजची स्थापना


अमेरिकेती न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजची स्थापना आजच्याच दिवशी म्हणजे 17 मे 1792 रोजी झाली. त्यादरम्यान 24 शेअर दलालांनी वॉल स्ट्रीटवरील ब्रिटनवूड करारावर स्वाक्षरी केली. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचे नंतर  8 मार्च 1817 रोजी न्यूयॉर्क स्टॉक आणि एक्सचेंज बोर्ड असे नामकरण करण्यात आले आहे. सध्या या बाजाराचे भांडवल हे 22. 649 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स इतकं आहे. 


1772 : इंग्रज व मराठे यांच्यात झाला सालबाईचा तह


मराठ्यांच्या इतिहासात महत्त्वाची घटना असलेल्या सालबाईचा तह (Treaty of Salbai) हा इतिहासात आजच्याच दिवशी म्हणजे 17 मे 1172 रोजी झाला. हा करार ब्रिटिश ईस्ट इंडियाच्या वतीनं वॉरन हेस्टिंग्ज आणि मराठ्यांच्या वतीनं महादाजी शिंदे यांच्यात झाला. त्यानंतर हेस्टिंग्जने जून 1782 मध्ये आणि नाना फडणवीस यांनी फेब्रुवारी 1783 मध्ये या करारास मान्यता दिली. या करारामुळे पहिलं अॅंग्लो-मराठा युद्ध संपलं. 


1749 : देवीची लस शोधून काढणाऱ्या डॉ. एडवर्ड जेन्नर यांचा जन्म


डॉ. एडवर्ड जेन्नर (Edward Jenner) या ब्रिटीश शास्त्रज्ञाचा शोध 17 मे 1749 रोजी झाला. त्यांनी देवीची लस शोधून काढली, त्यामुळे त्यांना लसीकरणाचे जनक म्हटले जाते. लस घेतल्यावर माणसाला आजार होत नाही असा पहिला विश्वास त्यांच्या या शोधामुळे मिळाला. 


1865 : इतिहासकार गोविंद सरदेसाई यांचा जन्म


गोविंद सरदेसाई हे मराठी इतिहासकार व लेखक होते. त्यांनी विविध ग्रंथांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा सुमारे हजार वर्षांचा इतिहास मांडला आहे. त्यामुळे भारतीय केंद्रशासनाने त्यांना इतिहासविषयक साहित्यातील योगदानासाठी पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव केला.ट


1934 :  अॅपल इन्क कंपनीचे सहसंस्थापक रॉनाल्ड वेन यांचा जन्म


ॲपलची स्थापना करण्यात रॉनाल्ड वेन यांचा मोठा वाटा आहे. रॉनाल्ड वेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एप्रिल 1976 मध्ये अॅपली स्थापना केली होती. 17 मे 1934 साली रॉनाल्ड वेन यांचा जन्म झाला. 


1945 : लेगस्पिनर भागवत चंद्रशेखर यांचा जन्म


भारताचा माजी क्रिकेटपटू फिरकीपटू चंद्रशेखर भागवत यांचा 17 मे  1945 रोजी कर्नाटकातील म्हैसूर येथे जन्म झाला. चंद्रशेखर भागवत यांनी 22 फेब्रुवारी 1964 रोजी इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदापर्ण केलं. तर, 12 जुलै 1979 रोजी अखेरचा कसोटी सामना खेळला. या काळात त्यांनी 58 कसोटी सामने खेळले. ज्यात 29.7 सरासरीनं आणि 2.70 इकोनॉमीनं 242 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे, त्यांनी आपल्या कारकिर्दीत एकमेव एकदिवसीय सामना खेळला. ज्यात त्यांनी 12.0 सरासरीनं आणि 3.85 इकोनॉमी रेटनं तीन विकेट्स घेतल्या.


1972 : शिल्पकार रघुनाथ फडके यांचे निधन


17 मे 1972 साली शिल्पकार रघुनाथ फडके यांचे निधन झाले. महाराष्ट्रातील ख्यातकीर्त शिल्पकार, चित्रकार, संगीत तज्ञ, साहित्यिक व ज्योतिषशास्त्राचे जाणकार अशी रघुनाथ फडके यांची ओळख आहे.


1979 : अभिनेत्री मुक्ता बर्वेचा वाढदिवस


मुक्ता बर्वे ही मराठी सिने-नाट्यसृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री आहे. मुक्ता बर्वेने अनेक सिनेमे, नाटक आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. मुक्ताने पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रमधून नाट्यशास्त्राची पदवी मिळवली आहे. मुक्ता बर्वेला अनेक पुरस्कारदेखील मिळाले आहेत. 


2004 : अमेरिकेतील पहिला कायदेशीर समलिंगी विवाह


16 मे 2004 रोजी अमेरिकेत पहिला कायदेशीर समलिंगी विवाह पार पडला. 


2020 : साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांचे निधन


साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांचे 18 मे 2020 रोजी निधन झाले आहे. रत्नाकर मतकरी यांनी अनेक नाटकं, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कांदबरी आणि ललित लेख लिहिले आहेत. तसेच त्यांना महाराष्ट्रात बालरंगभूमीची मुहूर्तमेढदेखील रोवली आहे.  18 मे 2020 ला कोरोनामुळे त्यांचे निधन झाले.