Nagpur News : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यामध्ये गेले काही दिवस शाब्दिक वाद सुरू आहे. दोघांकडून एकमेकांच्या विरोधात भक्कम पुरावे असल्याचे दावे केले जात आहेत. दोघांमधील हा वाद सुरु झाल्यानंतर उद्या पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख एका कार्यक्रमात एकत्रित येण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यात व्हर्च्युअल पद्धतीने तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचा उद्घाटन सोहळा (Inauguration Ceremony of Primary Health Centres) उद्या आयोजित केला आहे.
दोन प्राथमिक आरोग्य केंद्र अनिल देशमुख यांच्या काटोल विधानसभा क्षेत्रांतर्गत
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने नागपुरातून सुरेश भट सभागृहातून ऑनलाइन पद्धतीने तीनही प्राथमिक आरोग्य केंद्रांचा उद्घाटन करणार आहेत. तीन पैकी दोन प्राथमिक आरोग्य केंद्र अनिल देशमुख यांच्या काटोल विधानसभा क्षेत्रांतर्गत आहेत. त्यामुळं जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून या संदर्भात छापलेल्या निमंत्रण पत्रिकेवर स्थानिक आमदार म्हणून अनिल देशमुख यांचेही नाव छापण्यात आलं आहे. आता अनिल देशमुख या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असलेल्या सुरेश भट सभागृहात उपस्थित राहतात, की ते आपल्या मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यावेळी उपस्थित राहतात, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या: