जळगाव : विवाह समारंभातून कोरोनाची बाधा झाल्याने जळगाव शहरातील माजी नगरसेविका आणि त्यांच्या पतीचं निधन झाल्याची घटना समोर आली आहे. तर अन्य तिघांनाही कोरोनाची लागण झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रसार आणि वाढते मृत्यू काही केल्या कमी होताना दिसत नाही, अशाच एका घटनेत माजी नगरसेविका आणि त्यांच्या पतीचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची घटना समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.


जळगाव जिल्ह्यातील कोरोनाच्या बाधितांचा आकडा आता 5400 च्या वर जाऊन पोहोचला आहे. तर मृत्यूचा आकडा ही 309 इतका जाऊन पोहोचला आहे. शासन स्तरावर कोरोनाचा प्रसार आणि मृत्यू रोखण्यासाठी करावे लागणारे सर्व प्रयत्न केले जात असले तरी त्यात अद्याप पर्यंत म्हणावे असे यश मिळाल्याचे पाहायला मिळत नाही. अशाच एका घटनेत जळगाव शहरातील माजी नगरसेविका संगीता राणे आणि त्यांच्या पतीचा दोघांचं कोरोनाच्यामुळे निधन झाल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


जळगाव शहरातील अयोध्यानगर परिसराततील रहिवासी असलेल्या संगीता राणे या मागील पाच वर्षांच्या पूर्वी खानदेश विकास आघाडी कडून नगरसेविका म्ह्णून निवडून आल्या होत्या. गेल्या 5-6 दिवसांपूर्वी त्यांना आणि त्यांच्या पतीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं उघड झाले होते. तेव्हापासून कोविड रुग्णालयात त्यांच्या दोघांवर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे पती मोहन यांचं दोन दिवसापूर्वी निधन झाले होते तर काल संगीता राणे याचंही निधन झाल्यान राजकीय क्षेत्रांत मोठी खळबळ उडाली आहे.


संगीता राणे यांच्या परिवारात गेल्या दहा दिवस पूर्वी एक विवाह संपन्न झाला होता. या विवाह सोहळ्यात मुंबई आणि पुण्याचे नातेवाईक सहभागी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. आणि याच विवाह सोहळ्याच्या नंतर संगीता राणे आणि त्यांच्या परिवारात कोरोनाची लक्षणे दिसू लागली होती. यानंतर केलेल्या तपासणीत दोघे पती पत्नी पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यांच्यावर कोविड रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान दोघांची प्रकृती ढासळत गेल्याच पाहायला मिळालं होतं. परवा त्यांचे पती मोहन यांचं निधन झालं आहे तर काल माजी नगरसेविका संगीता राणे यांचं निधन झालं आहे.