मुंबई : राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार यांचे आज वयाच्या 76 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा पियुष, कन्या दीप्ती आणि गार्गी असा परिवार आहे. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांचे ते सासरे होत. बोंगीरवार हे मूळचे विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातले असून, त्यांनी उस्मानाबाद आणि नागपूर जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी पदावरही काम केलं होतं. तसेच ते औरंगाबाद, पुणे आणि कोकणचे विभागीय आयुक्त होते.
महसूल खात्यामध्ये त्यांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांनी बोंगीरवार कमिटीचे नेतृत्वही केले होते. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक आणि मनोहर जोशी या दोन मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. तसेच पुण्याचे महापालिका आयुक्तपद भूषवण्याचीही त्यांना संधी मिळाली होती. 1999 मध्ये त्यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती.
ते 1966 च्या आयएएस बॅचचे अधिकारी होते. प्रशासनात विविध पदांवर काम करत आपल्या कार्याचा ठसा उमटवितानाच 1999 मध्ये राज्याचे 25 वे मुख्यसचिव म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं.
त्यांनी माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक आणि मनोहर जोशी या दोन वेगवेगळ्या मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव म्हणूनही काम पाहिलं होतं. त्यांनी पुण्याचे महापालिका आयुक्त म्हणून पुण्यातील पार्वती झोपडपट्टीधारकांना विस्थापित न करता पुनर्वसन प्रकल्प राबविला होता. त्यांनी घालून दिलेलं पुनर्वसनाचं हे अनोखं मॉडल आजही देशपातळीवर राबविलं जात आहे. त्यांनी उस्मानाबाद, नागपूर, औरंगाबाद, पुणे आणि कोकण आदी ठिकाणी विविध पदांवर काम केलं आहे.
त्यांच्या निधनामुळे कर्तृत्वान अधिकारी हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. आज दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास त्यांच्यावर चंदनवाडी स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव सकाळी दहा ते साडे बाराच्या दरम्यान मंत्रालयाजवळील 'मूनलाईट', ओव्हल मैदानाच्या समोर, या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे.
माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार यांचे निधन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Dec 2018 10:40 AM (IST)
माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक आणि मनोहर जोशी या दोन मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. तसेच पुण्याचे महापालिका आयुक्तपद भूषवण्याचीही त्यांना संधी मिळाली होती. 1999 मध्ये त्यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -