Suryakant Dalvi Yogesh Kadam : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या लोकांनी बैठका, दौरे सुरु केले आहेत. राज्यात महायुतीत असणारे पक्ष एकत्र लढणार की स्वतंत्र लढणार? याची देखील जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच रत्नागिरी जिल्ह्यात मात्र, महायुतीमधील राजकीय वातावरण चांगलेच गरम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात भाजपचे नेते एकला चलो ची भूमिका घेत असल्याचं चित्र दिसत आहे. अशातच राजकीय नेते देखील ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. खेड मधील भाजपा कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्या दरम्यान भाषण करताना भाजपचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांची मंत्री योगेश कदम यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले सूर्यकांत दळवी ?
योगेश कदम निवडून येऊन मंत्री झाले तरीही खेड मध्ये रस्त्यांची अवस्था वाईटच असल्याचे वक्तव्य भाजपचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी करत योगेश कदम यांनी डिवचलं. रवींद्र चव्हाण येणार एवढे समजल्यावर शहरातील रस्ते रातोरात चांगले झाले. खेड नागपरिषदेत बदल झाला की काय? होईल याचा विचार करा, असं वक्तव्य देखील सूर्यकांत दळवी यांनी केलं आहे. आमदार निरंजन डावखरे यांच्या समोर सूर्यकांत दळवी यांचे एकला चलो रे बाबत सूचक वक्तव्य केल्यानं महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोबत कोणी आले तर ठीक, अन्यथा त्यांच्याशिवाय लढू, असं महत्वाचं वक्तव्य सूर्यकांत दळवी यांनी केलं आहे. दरम्यान, भाजप नेते वैभव खेडेकर यांच्यानंतर आता माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी देखील एकला चलो रे चा नारा दिला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात परिवर्तनाचा पहिला बॉम्ब खेडमध्ये फुटतो
रत्नागिरी जिल्ह्यात परिवर्तनाचा पहिला बॉम्ब खेडमध्ये फुटतो असेही सूर्यकांत दळवी यावेळी म्हणाले. दापोली विधानसभा मतदारसंघ दत्तक घ्या असा सल्ला देखील सूर्यकांत दळवी यांनी निरंजन डावखरे यांना दिला. त्यामुळं आता सूर्यकांत दळवी यांच्या वक्तव्यानंतर महायुतीत तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण दळवी यांच्या टीकेवर आता मंत्री योगेश कदम काय उत्तर देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा, 2 डिसेंबर रोजी मतदान
राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत मतदानाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी आजपासून म्हणजे 4 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या: