Dilip Sopal : बार्शीचे माजी आमदार दिलीप सोपल (Dilip Sopal) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बार्शीतून मी इच्छुक असल्याचे सोपल म्हणाले. मी शरद पवारसाहेबांचा कार्यकर्ता म्हणून 1976 पासून काम करत असल्याचे सोपल म्हणाले. तिनही पक्षाचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असंही त्यांनी सांगितलं.  


निवडणुकीला सामोरं जाताना थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो असल्याचे दिलीप सोपल म्हणाले. तिनही पक्षाचे वरिष्ठ जे निर्णय घेतील तो मला मान्य असेल असंही त्यांनी सांगितली. दरम्यान, मनोज जरांगे पाटलांबददल खूप मोठी सहनभूती असणारा बार्शी मतदारसंघ आहे. मी सुरुवातीपासून त्यांना पाठींबा दिला आहे. ते मला पाठींबा देतील का? हे मी सांगू शकत नाही असंही सोपल म्हणाले. मात्र, त्यांच्या उमेदवारांचा नक्कीच फटका बसू शकतो असेही सोपल म्हणाले. 


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बार्शीचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून दिलीप सोपल हे निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जातेय. मात्र, सोपल कोणत्या पक्षाकडून लढवणार याबाबतची चर्चा सध्या सुरु आहे. दिलीप सोपल यांनी बार्शीतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी आज शरद पवारासंह उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळं ते निवडणूक ळडवण्यावर ठाम असल्याचं बोललं जात आहे. 


भाजपची उमेदवारांची पहिली यादी जाहीर 


भाजपाने एकूण 99 जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तुलनेने सुरक्षित असणाऱ्या जागांचा भाजपाने आपल्या पहिल्या यादीत समावेश केला आहे. या यादीत भाजपा महाराष्ट्राचे भाजपाचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश आहे. सोबतच या यादीत काही खास नावं आहेत. भाजपाने अशोक चव्हाण यांच्या मुलीला संधी दिली आहे. अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांनादेखील भाजपाने संधी दिली आहे. श्रीजया या भोकर या मतदासंघातून निवडणूक लढवणार आहेत. सोबतच माज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांनादेखील भाजपाने तिकीट दिले आहे. ते भोकरदन या जागेवरून निवडणूक लढवतील. दरम्यान, भाजपने अनेक विद्यमान आमदारांच्या नावाची घोषणा न केल्यानं चर्चांना उधाण आले आहे. या आमदारांचा पत्ता कट होणार? नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


महत्वाच्या बातम्या:


भाजपच्या 'या' विद्यमान आमदारांची धाकधूक वाढली, पहिल्या यादीत समावेश नाही, संधी मिळणार की पलटी होणार?