नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज 9 नव्या न्यायाधीशांनी आपला पदभार संभाळला आहे. मुख्य न्यायाधीश एन व्ही रमन यांनी आज सकाळी 10.30 वाजता  तीन महिला न्यायाधीशांसह 9 जणांना न्यायाधीशाची शपथ दिली. यातील 8 जण उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. तर एकजण वरिष्ठ वकील असून ते थेट सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले आहेत. 


शपथविधीच्या कार्यक्रमाचे आयोजन 900 लोकांची आसनक्षमता असणाऱ्या सभागृहात करण्यात आले होते. कोरोनामुळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत शपथविधीचा सोहळा पार पाडला. यामध्ये सुप्रिम कोर्टाच्या न्यायाधिशांव्यतिरिक्त अटॉर्नी जनरल, सॉलिसीटर जनरल, बार असोसिएशनचे प्रतिनधी, ज्येष्ठ वकिल तसेच नवनियुक्त न्यायाधिशाचे कुटुंब आणि मित्र उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे वार्तांकण करण्यासाठी मोजक्या पत्रकारांना निमंत्रण देण्यात आले होते.


सकाळी 10.30  वाजता कार्यक्रमास सुरूवात झाली. सुप्रीम कोर्टाचे सध्याचे 24 न्यायाधीश पहिल्या तीन रांगेत बसले होते. चौथ्या रांगेत आज शपथ घेणारे न्यायाधीश बसले होते. 


आज शपथ घेतेलेल्या न्यायाधीशांची नावे


जस्टिस अभय श्रीनिवास ओका
जस्टिस विक्रम नाथ
जस्टिस जितेंद्र कुमार माहेश्वरी
जस्टिस हिमा कोहली
जस्टिस बंगलोर वेंकटरमैया नागरत्ना
जस्टिस चुडलायिल तेवन रविकुमार
जस्टिस एम एम सुंदरेश
जस्टिस बेला माधुर्य त्रिवेदी
पामीदिगंतम श्री नरसिम्हा


दोन वर्षानंतर नियुक्ती


गेली दोन वर्ष सुप्रीम कोर्टात नियुक्ती करण्यात आली नव्हती. त्यामुळे 34 पैकी 10  न्यायाधीशांच्या जागा खाली होत्या. आज झालेल्या नियुक्तीमुळे आता न्यायाधीशांची संख्या 33 झाली आहे.


भविष्यात  तीन न्यायाधीश चीफ जस्टीस बनण्याची शक्यता


आज निवड झालेल्या न्यायाधिशांपैकी जस्टिस विक्रम नाथ, जस्टिस बी वी नागरत्ना आणि  पी एस नरसिम्हा भविष्यात  मुख्य न्यायाधीश बनण्याची शक्यता आहे. सुप्रिम कोर्टात आजपर्यंत एकही महिला न्यायाधीशाची मुख्य न्यायाधिश म्हणून नियुक्ती झालेली नाही. सप्टेंबर 2027 ला जस्टिस नागरत्ना यांच्या रुपात भाराताला पहिली महिला मुख्य न्यायाधिश मिळण्याची शक्यता आहे