मुंबई : देशभरात देण्यात आलेल्या हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर राज्यातलं विधीमंडळाचं अधिवेशन गुंडाळण्याची शक्यता आहे. यासाठी सर्व गटनेत्यांच्या बैठक सकाळी साडे दहा वाजता होणार आहे. या बैठकीनंतर अधिवेशन आज संस्थगित होणार असल्याची माहिती आहे.

राज्यातलं विधीमंडळाचं अधिवेशन गुंडाळण्याची शक्यता



अधिवेशन काळात सर्व मंत्रिमंडळ आणि आमदार मुंबईत विधानभवन परिसरात असतात. यामुळं सुरक्षेवर अतिरिक्त ताण येतो. याच पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यासाठी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. सर्वांशी चर्चा करुन अधिवेशन संपवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

कालच्या सुरक्षा आढावा बैठकीत चालू बजेट अधिवेशन संपवण्याबाबत विचार झाला होता. अधिवेशन काळात सर्व मंत्रिमंडळ आणि राज्यातील आमदार मुंबईत विधानभवनात परिसरात असतात. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर अधिक ताण येतो आणि सर्व VIP एकाच ठिकाणी जमत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हा परिसर जास्त संवेदनशील होतो. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक विधिमंडळात बोलवण्यात आली आहे. या बैठकीत सर्वांशी चर्चा करून अधिवेशन संपवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

दरम्यान, अधिवेशन गुंडाळणे म्हणणे पळपुटेपणा आहे. अधिवेशन संस्थगित करायला आमचा विरोध आहे. एकीकडे अॅप उद्घाटन सुरू आहे, सभा सुरू आहेत ,मोदी फिरतात त्यांना संरक्षण लागत नाही का? हे नाटक बंद करा, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आपला विंग कमांडर तिकडे पाकिस्तानात आहे आणि आपण पळपुटेपणा करतो, असेही ते म्हणाले.