सांगली : संभाजी भिडे यांच्या सुरक्षेत हलगर्जी केल्याचा ठपका ठेवत, सांगली पोलिस दलातील पाच कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. सांगली जिल्हा पोलिस प्रमुख सुहेल शर्मा यांनी ही कारवाई केली.


निलंबित पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये सांगली शहरातील दोन, एलसीबीचा एक आणि मुख्यालयाचे दोन असे एकूण पाच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

ज्यावेळी कोरेगाव-भीमा येथे दंगल घडली, त्यानंतर संभाजी भिडे यांना पाच कर्मचारी आणि एक अधिकारी अशी सुरक्षा देण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी भिडेंच्या बंदोबस्ताची जबाबदारी असताना, हे कर्मचारी परस्पर बंदोबस्त सोडून गेले होते आणि भिडे त्या दिवशी कुठे कुठे गेले, ही त्या दिवसाची माहिती पोलिस स्टेशनला कळवली नसल्याने ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती जिल्हा पोलिस प्रमुख सुहेल शर्मा यांनी दिली.