Nilgai News : राज्यात सद्या मोठ्या प्रमाणावर तापमानात वाढ झाली आहे. दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. लोकांना उन्हाचा त्रास होत असताना प्राण्यांना देखील वाढत्या तापमानाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, वाढत्या उन्हाच्या चटक्यामुळं पाण्याच्या शोधात असलेल्या पाच निलगायी या विहिरीत पडल्याची घटना घडली. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील कोरवाडी याठिकाणी ही घटना घडली. यातील चार निलगायींना गावकऱ्यांना बाहेर काढण्यात यश आले असून, एका निलगायीचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, उन्हाचे चटके सर्वांनाच बसू लागले आहेत. त्यातच उन्हाचा फटका हा वन्य प्राण्यांना देखील बसत आहे. पाण्याच्या शोधात 5 निल गायी या विहिरीत पडल्या होत्या. यातील 4 निलगायींना गावकऱ्यांना बाहेर काढले आहे. मात्र, एका निलगायीचा मृत्यू झाला आहे. ही घटना परभणीच्या जिंतुर तालुक्यातील कोरवाडी येथे घडलीय. उन्हाचा पारा वाढला असल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात आहेत. जिंतूर तालुक्यातील कोरवाडी शिवारातील शिवाजी बनसोडे यांच्या शेतामध्ये पिण्याच्या पाण्याच्या शोधात आलेल्या पाच निलगाई विहिरीत पडल्या. याबाबतची माहिती सरपंचांनी तत्काळ वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. गावकऱ्यांच्या मदतीने वन कर्मचाऱ्यांनी विहिरीतून निलगाई वर काढल्या. मात्र एका निलगाईचा दुर्देवी मृत्यू झाला.
दरम्यान, राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये उष्णतेचा कहर सुरु आहे. मार्च महिन्यात दोन वेळा उष्णतेची लाट आली. पण एप्रिल महिन्यातही नागरिकांची उन्हापासून सुटका होणार नाही असे चित्र दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील तापमान हे 40 अंशाच्या पुढे आहे. तर काही जिल्ह्यात 42 अंश ते 43 अंश तापमानाची नोंद देखील झाली आहे. त्यामुळे उन्हाचा त्रास नागरिकांसह प्राण्यांना देखील होत आहे. गेल्या पंधरा दिवसापासून राज्यात उष्णतेची लाट पसरली आहे. उष्णतेची लाट तीव्र झाल्याने अनेकांनी दुपारच्या वेळात घरा बाहेर पडण्याचं टाळले. एरवी भर दुपारी भरभरून वाहणारे रस्ते आता मात्र अघोषित संचारबंदीसारखे निर्मनुष्य झाल्याचं पाहायला मिळत आहे. ज्या नागरिकांना अतिशय महत्वाच्या कामानिमित्त घराबाहेर पडावे लागत आहे ते नागरिक उन्हापासून बचाव करणाऱ्या उपाययोजना करून बाहेर पडत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: