मुंबई : महाराष्ट्रात आणखी पाच ठिकाणी पासपोर्ट कार्यालायं सुरु केली जाणार आहेत. यामध्ये चंद्रपूर आणि बारामतीचाही समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी याबाबत माहिती दिली.

कुठे नव्याने पासपोर्ट कार्यालय उघडणार?

  1. अकोला

  2. अमरावती

  3. चंद्रपूर

  4. बारामती

  5. माढा


देशातील नागरिकांना पासपोर्ट सेवा सहज आणि सुलभपणे मिळावी या उद्देशाने ही नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरु केली जात आहेत.

व्हिडिओ : पासपोर्टसाठी अर्ज करण्याच्या सोप्या टिप्स

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सरकारने मार्चपर्यंत देशभऱात 251 नवे केंद्र सुरु करण्याचे ठरवले होते. त्यापैकी 20 केंद्र महाराष्ट्रात सुरु केली गेली.

https://twitter.com/MahaGovtMic/status/996995870800338944

आतापर्यंत महाराष्ट्रात 27 पासपोर्ट कार्यालये असून, या नव्या पाच कार्यालयांची त्यात भर पडल्यानंतर ही संख्या 32 वर जाईल.

संबंधित बातम्या :

पासपोर्टच्या नियमात 5 दिलासादायक बदल, धावपळ कमी होणार!

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

6 दिवसात पासपोर्ट पडताळणी, नागपूर पोलीस राज्यात अव्वल

पासपोर्ट यापुढे अधिकृत रहिवासी दाखला नसणार?

राज्यात 16 नवीन पासपोर्ट केंद्र सुरु होणार

लवकरच डोंबिवलीतही पासपोर्ट काढता येणार!

पासपोर्टसंबंधी सुषमा स्वराजांकडून मोठी घोषणा

केंद्र सरकारकडून 149 नव्या पोस्ट ऑफिस, पासपोर्ट केंद्रांची घोषणा

आता सर्व जिल्ह्यात पासपोर्ट मिळणार