Maharashtra political shivsena :  राजकीयदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. कारण शिवसेनेच्या (Shivsena) इतिहासात पहिल्यांच दोन दसरा मेळावे होते आहे. शिवसेनेत पडलेल्या अभूतपूर्व फूटीनंतर आज शिवसेनेचा आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा (Dasara Melava) होणार आहे. दरम्यान, यापूर्वीच शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने (MP Krupal Tumane) यांनी ठाकरेंना धक्का देणारा दावा केला आहे. बीकेसी (BKC) मैदानावर होणाऱ्या शिंदे गटाच्या मेळाव्यात आज आणखी दोन खासदार आणि पाच आमदार शिंदे गटात प्रवेश करतील असा दावा खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे. त्यामुळं ते दोन खासदार आणि पाच आमदार कोणते अशी राजकीय वर्तळात चर्चा सुरु आहे.


एक खासदार मुंबईचा आणि एक मराठवाड्याचा, तुमानेंचा दावा


दरम्यान, नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी हजेरी लावली. त्यानंतर कृपाल तुमाने यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आज आणखी दोन खासदार आणि पाच आमदार शिंदे गटात प्रवेश करतील असा दावा केला आहे. हा दावा ठाकरेंनीसाठी धक्कादायक मानला जात आहे. कारण आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेचे 40 आमदार आले आहेत. पुन्हा आणखी जर पाच आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केला तर हा ठाकरेंसाठी मोठा धक्का असणार आहे. आज प्रवेश करणाऱ्या दोन पैकी एक खासदार मुंबईचा आणि एक मराठवाड्याचा असू शकतो. एक प्रभावी खासदार आज शिंदे गटात प्रवेश करु शकतो असे तुमाने यांनी म्हटलं आहे. त्याशिवाय पाच आमदार शिंदे गटात येतील असा दावा देखीलतुमाने यांनी केला आहे. 


बाळासाहेबांचा विचार घेऊन समोर जाणारी शिवसेना आमची


मोठ्या संख्येने शिवसेनेचे लोकप्रतिनिधी शिंदे गटात आधीच आले आहे. त्यामुळं हीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटानं केला आहे. बाळासाहेबांचा विचार घेऊन समोर जाणारी शिवसेना आहे. ज्यांनी शिवसेनेला सदैव शिव्या दिल्या आम्ही त्यांच्यासोबत गेलो नाही. शिवसेनेच्या दुर्देशेला आम्ही जबाबदार नाही असे देखील तुमानेंनी  म्हटलं आहे. शिंदे यांच्यासोबत राज्यातील 50 आमदार आणि 12 खासदार आले आहेत. जनता शिंदे साहेबांच्या सोबत असल्याचे तुमाने म्हणाले. आमचीच शिवसेना खरी शिवसेना आहे. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊस जनतेसमोर जात असल्याचे तुमाने म्हणाले. कोणते खासदार आणि आमदार शिंदे गटात जाणार याबाबत तुमानेंना विचारल्यावर ते म्हणाले की, यामध्ये एक मराठवाड्यातील खासदार आणि एक मुंबईतील खासदार असू शकतो असे तुमानेंनी सांगितले.


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Politics Shivsena: महाराष्ट्राला मोडून ‘वंदे मातरम्’ची गर्जना कशी करता येईल? शिवसेनेचा शिंदे-भाजपला सवाल