अलिबाग : इंटरनेटद्वारे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलांना अलिबागमधून अटक करण्यात आली आहे. यात पाच परदेशी कॉलगर्ल्सचा समावेश आहे. रायगडच्या गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली आहे.


इंटरनेटच्या माध्यमातून हायप्रोफाईल सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती रायगडच्या अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार अन्वेषण विभागाने काही वेबसाईटवरुन मिळालेल्या माहितीनुसार फोन करून या परदेशी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

सेक्स रॅकेट चालविणाऱ्यांनी दोन सोशल वेबसाईट तयार केल्या होत्या. या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी रायगडच्या गुन्हे अन्वेषण विभागाने बोगस कस्टमर्स तयार केले. त्या बोगस कस्टमर्सनी अलिबाग येथील सेव्हन स्टार हॉटेल रेडिसनमध्ये कॉल गर्ल्सला बोलावलं. त्यानंतर पोलीसांनी या हॉटेलवर छापा टाकला. या कारवाईत दलालासह इतर दोघांना अटक करण्यात आली आहे.

अटक केलल्या इसमांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मुंबईतील एका रुमवर सुद्धा छापा टाकला. या छाप्यात तीन महिलांना अटक करण्यात आली असून यात दोन परदेशी महिलांचा समावेश आहे.

दरम्यान या सगळ्या घटनेमध्ये अटक करण्यात आलेल्या कॉलगर्ल्स या कोलंबिया आणि दक्षिण अमेरिका येथील असल्याचे चौकशीत समोर आले. या कॉलगर्ल्स टुरिस्ट व्हिजावर भारतात दाखल झाल्या होत्या. अटक केलेल्या या कॉलगर्ल्सनी बंगळुरु, पुणे, दिल्ली, हैदराबाद, चंदिगढ या ठिकाणी सुद्धा देहव्यापार केल्याची कबुली दिली.

या कारवाईत संदीपकुमार रवींद्रकुमार सिंह (30) तर नितेश राजनंद सिंग (40) या दोन्ही चालकांना ताब्यात घेण्यात आले. तसेच नरेश सुंदरलाल खाटील (42) , ट्रॅव्हल्स एजंट व डॅफनी क्लेरा लिकन पॅपी (60), दलाल यांसह पाच कॉलगर्ल महिलांना अटक करण्यात आली.