सोलापूर : सोलापूर शहरात दररोज कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. मात्र ग्रामीण भागात देखील आता कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. सोलापूर शहरात आज 86 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ग्रामीण सोलापुरात तब्बल 107 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ग्रामीण सोलापुरात एका दिवसात झालेली ही सर्वाधिक वाढ आहे.
एकट्या बार्शी तालुक्यात तब्बल 50 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या पोहोचली 3978 वर पोहोचली आहे. आज जिल्ह्यात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्य़ंत जिल्ह्यातील 332 रुग्णांचे कोरोनामूळे मृत्यू आहे. आज दिवसभरात 59 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 2086 रुग्ण बरे होऊन परतले आहेत. उर्वरित 1560 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
सोलापूर शहरासह आजूबाजूच्या काही गावांत 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन
दरम्यान राज्य शासनाने नियुक्त केलेल्या समितीने आज बार्शी येथील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून कार्यरत असलेल्या जगदाळे मामा हॉस्पिटल आणि सुश्रुत हॉस्पिटलला भेट देऊन पाहणी केली. यावेळी समितीने डॉक्टरांना बरोबर चर्चा केली आणि मार्गदर्शन करुन उपलब्ध सुविधांची माहिती घेतली. राज्य शासनाच्या सुचनेनुसार वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनचे संचालक डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी या समितीची स्थापना केली आहे.
या समितीमध्ये अध्यक्ष म्हणून पुण्याच्या बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रा. डॉ. शशिकला सांगळे, सदस्य म्हणून लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. व्यंकटेश जोशी आणि नांदेडच्या श्री. शं. च. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्रा. डॉ. विजय कापसे यांचा समावेश होता. समितीमधील डॉक्टर औषधवैद्यकशास्त्र, बधिकरणशास्त्र आणि छाती व श्वसनविकारशास्ञ विषयाचे तज्ञ आहेत. तज्ञ समिती सोबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रदीप ढेले उपस्थित होते .यावेळी महात्मा फुले जन आरोग्य योजना सुश्रुत हॉस्पिटलला त्वरित सुरू करण्या बाबत समितीने सूचना केली.
Lockdown Update | राज्यातील 'या' शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन
#Lockdown राज्यातला लॉकडाऊन उठवा,व्यवहार पूर्ववत करण्याची भाजप खासदार विनय सहस्त्रबुद्धेंची मागणी