दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून पहिली मदत जाहीर
एबीपी माझा वेब टीम | 27 Jan 2019 05:35 PM (IST)
सरकार जाहीर केलेल्या मदतीचा दुसरा टप्पा 31 मार्चपूर्वी शेतकऱयांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. दुष्काळाच्या काळात देशात जाहीर झालेल्या मदतींपैकी ही सर्वात मोठी मदत असणार आहे.
उस्मानाबाद : यंदाच्या दुष्काळात सरकारने पहिली मदत जाहीर केली आहे. 151 दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना 2 हजार 900 कोटींची मदत मिळणार आहे. जाहीर झालेली मदत शतकऱ्यांना दोन टप्प्यांमध्ये मिळणार आहे. या मदतीचे सर्व पैसे बँक खात्यावर थेट जमा होणार आहे. या पैशातून बँकांना कोणतीही वसुली करता येणार नाही. शेतकऱ्यांचे दोन हेक्टर क्षेत्रात 30 टक्क्यांहून अधिक नुकसान झालं असेल तर दोन टप्प्यात 6 हजार 800 रुपये मदत मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात हंगामी पीक उत्पादक शेतकऱ्यांना 3 हजार 400 रुपये मिळणार आहे. तयेच यंदाच्या दुष्काळात फळबागांनाही सरकारकडून विक्रमी मदत जाहीर झाली आहे. बहुवार्षिक पिकांसाठी दोन हेक्टरपर्यंत 18 हजार रुपयांची मदत मिळणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये मिळतील. सरकार जाहीर केलेल्या मदतीचा दुसरा टप्पा 31 मार्चपूर्वी शेतकऱयांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. दुष्काळाच्या काळात देशात जाहीर झालेल्या मदतींपैकी ही सर्वात मोठी मदत असणार आहे. हंगामी पीक उत्पादक शेतकऱ्यांना कमीत कमी एक हजार रुपये तर फळबागवाल्यांना कमीत कमी दोन हजार रुपये मिळणार आहे. आदर्श आचारसंहिता घोषित झालेल्या 264 ग्रामपंचायतींना मात्र ही मदत तूर्तास मिळणार नाही आहे. ज्या खात्याचे आधार लिंकिंग आहे त्याच खात्यावर या मदतीचे पैसे मिळणार आहे. एकूण किती शेतकऱ्यांना मदत मिळणार? सर्वच शेतकरी हंगामी पीक घेतात आणि प्रत्येक जण दोन हेक्टरपर्यंत पात्र आहे असं गृहीत धरलं तर 21,38970 शेतकरी सर्वच शेतकरी फळबाग धारक आहेत आणि दोन हेक्टरपर्यंत क्षेत्र आहे असं गृहीत धरलं तर 8,08,055 शेतकरी