शिर्डी: शिर्डीत पाकिटमारांचं मनोबल दिवसेंदिवस वाढत आहे. याच पाकीटमारांच्या भांडणात झालेल्या गोळीबारात एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. किसन आनंदा बागुल असं मृत तरूणाचं नाव आहे.
शिर्डीतील शासकीय विश्रामगृहाजवळ चोरलेल्या मोबाईलवरून भांडण सुरू होतं, हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या किसनला मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली. असा आरोप मृत किसनच्या आईनं केला आहे.
याप्रकरणी कुणाल चौधरीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गोविंद विजय त्रिभुवन, राहुल सुरेश पवार, शंकर विरण स्वामी या आरोपींचा सध्या शोध सुरू आहे. पण घडलेल्या घटनेने शिर्डीतील गँगवॉर पुन्हा चर्चेत आलं आहे.