मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मध्ये छापलेल्या व्यंगचित्राप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅड. विष्णु नवले यांच्या तक्रारीनंतर परभणीच्या नानल पेठ पोलिस ठाण्यात उद्धव ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.


मराठा मोर्चावरुन 'सामना'मध्ये रविवारी वादग्रस्त व्यंगचित्र छापलं होतं. मोर्चांचं विडंबन करणाऱ्या या व्यंगचित्रामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या. तसंच व्यंगचित्रामुळे मराठा समाजातील स्त्रियांची बदनामी झाली आहे. शिवाय हे व्यंगचित्र समाजात तेढ निर्माण करणारं असल्याचा आरोप तक्रारदार नवले यांनी केला आहे.

या प्रकरणी उद्धव ठाकरेंसह 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत, व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई, मुद्रक आणि प्रकाशक राजेंद्र भागवत, जिल्हा वितरक यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंडविधान कलम 153 अ, 292, 505, 500 आणि 109 अंतर्गत गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाईंकडून दिलगिरी

शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'तील वादग्रस्त कार्टूनप्रकरणी व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. कोणत्याही समाजाचा भावना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या असतील ती मी दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दात श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी 'सामना'तून व्यंगचित्र वादावर स्पष्टीकरण दिलं आहे.

माफी मागण्याचा प्रश्नच नाही : शिवसेना

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी व्यंगचित्राचा वाद राजकीय फायद्यासाठी पेटवत आहे. त्यामुळे याप्रकरणी उद्धव ठाकरेंनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.

वादग्रस्त व्यंगचित्र आणि दगडफेक

मराठा मोर्चावरुन 'सामना'मध्ये रविवारी वादग्रस्त कार्टून छापलं होतं. याच्या निषेधार्थ नवी मुंबईतील वाशी इथल्या ‘सामना’च्या कार्यालयावर अज्ञातांनी दगडफेक केली. तर ठाण्यातील कार्यालयावर शाईफेक करण्यात आली. इतकंच नाही वादग्रस्त कार्टूनमुळे ठिकठिकाणी 'सामना' पेपर जाळून निषेध नोंदवला जात आहे.

संभाजी ब्रिगेडने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली

दरम्यान, संभाजी ब्रिगेडने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ‘सामना’ने मराठा समाजाची आणि महिलांची बदनामी केली आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे

संंबंधित बातम्या

'सामना'तील वादग्रस्त कार्टूननंतर सेना नेत्यांच्या मनात काय खदखदतंय?

शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याचा राजीनामा नाही : अनिल देसाई

सामनातील कार्टून वाद, बुलडाण्याच्या खासदार-आमदारांचा राजीनामा

‘सामना’तील व्यंगचित्राचा निषेध, सेना पदाधिकाऱ्यांत राजीनामासत्र

व्यंगचित्रावरुन वाद पेटवण्याचा प्रयत्न, माफी मागण्याचा प्रश्नच नाही: शिवसेना

‘सामना’च्या कार्यालयावर वाशीत दगडफेक, ठाण्यात शाईफेक

‘ते’ व्यंगचित्र छापलं नसतं, तर बरं झालं असतं : नीलम गोऱ्हे

सामनाच्या कार्यकारी संपादकांना ‘कार्टून’ म्हणावसं वाटतं: आशिष शेलार

कार्टूनमुळे शिवसेनेची मराठा मोर्चाबाबतची भूमिका समजली : मुंडे

उद्धव ठाकरेंनी जाहीर माफी मागावी: राधाकृष्ण विखे-पाटील

इरादे मेरे हमेशा साफ होते है, संजय राऊत यांची सूचक पोस्ट