केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त आणि शहर अभियंत्यावर गुन्हा
एबीपी माझा वेब टीम | 23 Aug 2016 03:30 AM (IST)
कल्याण : पर्यावरण संरक्षण कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अडचणीत येण्याची शक्यता आहे. केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्तांशिवाय शहर अभियंता पी. के. उगले यांच्या विरोधातही फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात बीएसयूपी प्रकल्प राबवताना पर्यावरण संरक्षण कायद्याची अंमलबजावणी न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने अतिरिक्त आयुक्त आणि शहर अभियंत्यांवर ही कारवाई केली आहे. या संदर्भात पुढील सुनावणी 6 ऑक्टोबरला होणार आहे.