सांगली : मुख्यमंत्र्यांनी राज्याचा आणि पालकमंत्र्यांनी जिल्हा न सोडता रोज आढावा घेऊन कोरोनाने भयभीत झालेल्या लोकांना दिलासा देण्याची गरज आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ' मातोश्री ' या त्यांच्या निवासस्थानातून राज्य चालवितात . त्यामुळे या सरकारचा जनतेशी संवाद राहिलेला नाही , अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली . इस्लामपूर चे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी प्रकाश हॉस्पिटलमध्ये सुरू केलेल्या कोविड सेंटरचे उद्‌घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते .


शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी रामाच्या मूर्तीला मिशा असाव्यात या वक्तव्यावर पाटील म्हणाले, संभाजी भिडेंनी मुर्तीबद्दल व्यक्त केलेले मत हे वैयक्तीक आहे. त्यामुळे रामाच्या मुर्तीला मिशा असाव्यात का नसाव्यात मी यावरती काहीही बोलू शकत नाही. हा संशोधनाचा विषय आहे.


'राम मंदीर भुमीपूजनाचा सोहळा साजरा करताना सोशल डिस्टन्सींगचा नियम पाळावा. सर्वत्र गुढ्या उभा कराव्यात. देशातील प्रत्येक नियम पाळणारा हा हिंदू आहे ; असे मी समजतो . राम मंदिर हा आमच्या अस्मितेचा भाग आहे. मंदिर शांततेने पूर्ण व्हावे ही अपेक्षा आहे. देशाच्या प्रत्येक गोष्टी आपला मानणारा प्रत्येकजण हिंदू आहे. राम या सर्वांच्या अस्मितेचा भाग आहे. मंदिराच्या उभारणीचा आनंद सर्वानी आपापल्या घरी राहून साजरा करावा', असे आवाहन पाटील यांनी केलं आहे.


राज्यातील कोरोना परिस्थितीवर देखील पाटील यांनी भाष्य करत मुख्यमंत्र्यांनी राज्याचा आणि पालकमंत्र्यांनी जिल्हा न सोडता रोज आढावा घेऊन कोरोनाने भयभीत झालेल्या लोकांना दिलासा देण्याची गरज आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणलालेत. मुख्यमंत्री मातोश्रीवर बसून आढावा घेत आहेत त्याने काही साध्य होणार नाही. सांगली जिल्ह्यातील परिस्थिती आवाक्‍याबाहेर गेली आहे. पालकमंत्र्यांनी रोजच्या रोज आढावा घेऊन सायंकाळी सातला पत्रकार परिषदेत माहिती द्यावी. शासनाचा नागरिकांशी संवाद नसल्याने नागरिक भयभीत होत आहेत. लोकांच्या मनातील भीती कमी होण्यासाठी पालकमंत्र्यांनी तसा विश्वास दिला पाहिजे. धारावीचा पॅटर्नचा सरकार कडून गवगवा केला जातो मात्र मुंबई जवळच असलेल्या ठाणे मध्ये हा धारावी पॅटर्न राज्य सरकार का राबवत नाही असा सवालही पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.


इस्लामपुरात निर्माण झालेली कोरोनाची स्थिती चांगली हाताळली गेली. यात आमचे नगराध्यक्षांचे कौतुकच आहे. मात्र सांगलीच्या पालकमंत्र्यांनी सांगलीत ठाण मांडून काम केले पाहिजे, इस्लामपूर पॅटर्न सांगलीत का राबविला जात नाही . निशिकांत पाटील यांनी सुरू केलेल्या कोविड सेंटरमुळे प्रशासनास मोठी मदत होईल. कोरोना सामाजिक समस्या बनल्याने सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे असेही पाटील म्हणाले.


Rana Family Corona | आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणांच्या कुटुंबातील 10 जणांना कोरोना