सांगली : सांगलीतील मार्केट यार्डातील नानवाणी किराणा मालाच्या दुकानात छापा टाकून गुटखा, तसेच सुगंधित तंबाखूचा दहा लाख रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे.
या दुकानातून सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात गुटखा, तंबाखूचा पुरवठा केला जात होता. किराणा माल विक्रीच्या नावाखाली दुकानात गुटखा आणि तंबाखूचा साठा ठेवण्यासाठी या दुकानात गोदाम करण्यात आलं होत. पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील आणि त्याच्या पथकाने ही कारवाई केली.
राज्य शासनाने गुटखा व सुगंधित तंबाखूचे उत्पादन आणि विक्रीवर बंदी घातली आहे. तरीही चोरुन उत्पादन करुन त्याची विक्री सुरुच होती. येथून सांगली, कोल्हापूर, सातारा व सोलापूर जिल्ह्यात गुटखा, तंबाखूचा पुरवठा केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने गोदामाची झडती घेतल्यानंतर सुगंधित तंबाखू तसेच विविध कंपन्यांचा गुटखा सापडला.
याप्रकरणी रात्री उशिरा विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अन्न व औषध प्रशासन विभागच या प्रकरणाचा तपास करणार आहेत. गुटखा व तंबाखूचा साठा कुठून आणला, तो कुठे विकला जाणार होता, याची सखोल चौकशी केली जाईल, असे सहायक आयुक्त सुकुमार चौगुले यांनी सांगितले
सांगलीत किराणा दुकानात छापा, 10 लाखांचा गुटखा जप्त
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Oct 2018 12:02 PM (IST)
या दुकानातून सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात गुटखा, तंबाखूचा पुरवठा केला जात होता. किराणा माल विक्रीच्या नावाखाली दुकानात गुटखा आणि तंबाखूचा साठा ठेवण्यासाठी या दुकानात गोदाम करण्यात आलं होत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -