लातूर : फादर्स डेच्या पूर्व संध्येला लातुरातील चाकूर येथे मुलाने जन्मदात्या पित्याचा खून केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आज निलंगा तालुक्यात मुलाने बापाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे हे दोन्हीही खून जमिनीच्या वादातून झाले आहेत. एकापाठोपाठ एक घटना घडल्याने नागरिकांनाही धक्का बसला आहे.


निलंगा तालुक्यातील भोसलेवाडी या गावात पंचप्पा धुप्पाधुळे यांची वडिलोपार्जित शेत जमीन आहे. पावसाने चांगली साथ दिल्यामुळे त्यांनी पेरणी सुरू केली. या शेत जमिनीचा वाद आहे. त्याचा मुलगा नागनाथ यांचा वडिलांशी वाद होता. वडिलांनी पेरणी सुरू केली याचा राग त्याच्या मनात होता. या रागातून त्याचे वडिलांशी भांडण झालं. या वादात नागनाथ याची मुले बायको आणि मेव्हणे यांनीही साथ दिली. नागनाथ याने लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. यात पंचप्पा यांचा मृत्यू झाला आहे. हे भांडण सोडविण्यास गेलेल्या चार जणांना जबर मार बसला आहे. जखमींवर निलंगा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या बाबत निलंगा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेतील सर्व आरोपी फरार झाले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.


बँकिंग व्यवहारांबद्दलच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ग्रामीणांना लुटणारी टोळी जेरबंद


चाकूरमध्ये शेतीच्या वादातून माजी पंचायत समिती सभापतीचा खून

चाकूर पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत मारापल्ले यांना दोन मुले आहेत. एक मुलगा शिक्षक आहे. तो बाहेरगावी नोकरी करतो. त्याचा दुसरा मुलगा धनंजय गावात राहतो. दारूच्या आहारी गेल्यामुळे त्याचे घरात कोणाशीही पटत नव्हते. यामुळे तो वेगळा राहत होता. मागील अनेक दिवसांपासून तो वडिलांच्या मागे लागला होता की शेतीची वाटणी करून द्या. चंद्रकांत मारापल्ले यांना त्याचा स्वभाव माहीत होता. वाटणी केल्यास धनंजय शेत विकेल यामुळे ते वाटणी करून देत नव्हते. याचा राग मनात धरून 19 तारखेला सकाळी धनंजय याने वडिलांशी भांडण केलं. शेतातील फरशी त्याच्या डोक्यात मारली. याची माहिती धनंजय यांच्या मुलाने गावात दिली. तात्काळ चंद्रकांत मारापल्ले यांना लातूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान त्याचा काल मृत्यू झाला. याची माहिती चाकूर पोलीस ठाण्यात कळताच त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. धनंजय यास अटक करण्यात आली असून चाकूर पोलीस पुढील तपास करत आहेत. मागील अनेक वर्षे स्थानिक राजकारणात सक्रिय असलेले चंद्रकांत मारापल्ले यांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


Mahavitaran | कोरोनामुळं महावितरण कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास 30 लाखांचं अनुदान