बुलडाणा: सुनेच्या छळाला कंटाळून सासऱ्याने आत्महत्या केल्याची घटना बुलडाण्यातील खामगावात घडली आहे. खामगावातील साहेबराव अंबिळडीगे हे ग्रामपंचायतीचे सेवानिवृत्त सदस्य होते. काल विष प्राशन करुन त्यांनी आत्महत्या केली.

 

साहेबराव अंबिळडीगे यांच्या मुलाचं मागच्या वर्षी पूनम नावाच्या मुलीबरोबर लग्न झालं. मात्र, पूनम ही साहेबरावांना पोलिसांत खोट्या तक्रारी देण्याची आणि बदनामीची धमकी देत होती. अखेर तिने दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून साहेबराव यांनी विष प्राशान करून आत्महत्या केली.

 

आत्महत्येपूर्वी त्यांनी ३५ पानांची सुसाईट नोट लिहिली आहे. ज्यामध्ये सुनेकडून होणाऱ्या छळवादाचा सगळा घटनाक्रम त्यात लिहिला आहे.