नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या पितापुत्राचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मालवणमधील श्रावण गावात घडली आहे. उन्हाळी सुट्टीनिमित्त गावी आलेले महेश चंद्रकात वेदरे व मुलगा मयूर महेश वेदरे घारापासून काही अंतरावर असलेल्या नदीत अंघोळीसाठी गेले होते. यावेळी महेश यांच्या बहिणीने त्यांना पाण्यात पुढे न जाण्याची सूचनाही केली. कपडे धुण्याच्या कामात व्यस्त असल्याने नेमकं काय झालं हे तिच्या लक्षात आलं नाही.
काही वेळाने समोर पाहिले असता, भाऊ महेश व मयुर दिसत नसल्याने तिने मोठमोठ्याने हाका मारल्या, मात्र कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने तिला दोघे बुडाल्याचा संशय आला. ती मोठमोठ्याने मदतीसाठी हाका मारत जवळ असलेल्या घराच्या दिशेने ती धावत सुटली आणि नदीत उतरलेले ते दोघे दिसत नसल्याचे तिने गावकऱ्यांना सांगितले. त्यानंतर स्थानिकांनी धावाधाव करत दोघांना नदीत शोधण्याचा प्रयत्न केला.काही काळाने महेश व त्यांचा मुलगा मयूर हे मृत अवस्थेत आढळून आले.
या घटनेनंतर वेदरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पती व मुलाच्या अचानक जाण्याने धक्का बसलेल्या मयूरच्या आईचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता. मूळ श्रावण गावचे निवासी महेश नोकरीनिमित्त मुंबईत राहत होते. आठ दिवस गावात राहून ते पुन्हा मुंबईला परतणार होते, मात्र या नियतीने एक दिवस अगोदरच मुलासह त्याच्यावर काळाचा घाला घातला.
नदीत अंघोळीसाठी गेलेल्या पिता पुत्रावर काळाचा घाला, मालवणमध्ये दोघांचा बुडून मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 May 2019 01:36 PM (IST)
उन्हाळी सुट्टीनिमित्त गावी आलेले महेश चंद्रकात वेदरे व मुलगा मयूर महेश वेदरे घारापासून काही अंतरावर असलेल्या नदीत अंघोळीसाठी गेले असता नदीत बुडून दोघांचा मृत्यू झाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -