FASTag Annual Pass : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने वाहनचालकांसाठी FASTag वार्षिक पास सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, ही सुविधा 15 ऑगस्ट 2025 पासून लागू होणार आहे. या उपक्रमामुळे वाहनचालकांना वारंवार टोलसाठी फास्टॅग रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही. यामुळे वेळेची बचत, खर्चात घट, आणि टोल प्लाझांवरील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.
एकदाच रिचार्ज, वर्षभर टोलपासून मुक्ती
NHAI ने फास्टॅगच्या नियमांमध्ये बदल करत खासगी कार, जीप, व्हॅनसारख्या खासगी गाड्यांसाठी वार्षिक पास देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या परिस्थितीत टोल नाक्यावर वाहनाच्या वजनानुसार वेगवेगळं शुल्क घेतलं जातं. त्यानुसार आता 200 टोल क्रॉस करण्यासाठी जवळपास 10000 रुपये लागू शकतात. पण आता एक टोल क्रॉस करण्यासाठी 15 रुपये शुल्क आकारलं जाईल. त्यामुळे केवळ 3000 रुपयांमध्ये काम होईल. जे लोक लांबचा प्रवास करतात त्यांच्यासाठी ही सुविधा अधिक फायदेशीर ठरू शकते.
कोणत्या मार्गांवर लागू होणार?
हा वार्षिक पास फक्त NHAI आणि रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय (MoRTH) च्या अखत्यारीतील राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर लागू असेल.
- मुंबई–रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग
- दिल्ली–मुंबई एक्सप्रेसवे
- मुंबई–नाशिक महामार्ग
- मुंबई–सुरत मार्ग
मात्र, राज्य महामार्ग किंवा महापालिकेच्या टोल मार्गांवर (उदा. मुंबई–पुणे एक्सप्रेसवे, मुंबई–नागपूर समृद्धी महामार्ग, अटल सेतू) हा पास लागू होणार नाही. अशा मार्गांवर फास्टॅग नेहमीप्रमाणे टोल शुल्क आकारले जाईल.
फास्टॅग वार्षिक पास कसा काढाल?
- राजमार्ग यात्रा अॅप (Rajmarg Yatra App) किंवा NHAI/MoRTH च्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.
- वाहन क्रमांक आणि फास्टॅग आयडीने लॉगिन करा.
- 3000 रुपयांचे ऑनलाईन पेमेंट करा (UPI, डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे).
- पास तुमच्या FASTag खात्याशी लिंक होईल आणि 15 ऑगस्ट रोजी SMS द्वारे ॲक्टिवेशनची माहिती मिळेल.
महत्त्वाचे नियम काय?
- हा पास फक्त खासगी वाहनांसाठी आहे.
- व्यावसायिक वाहनांवर हा पास लागू होणार नाही.
- पास नॉन-ट्रान्सफरेबल आहे, म्हणजेच तो केवळ नोंदणीकृत वाहनासाठीच वापरता येईल.
- निवडक राष्ट्रीय महामार्गांवरच हा पास लागू राहील.
इतर महत्त्वाच्या बातम्या