नाशिक : शेतकरी विरोधी मोदी सरकार सत्तेवरून खाली उतरत नाही, तोपर्यंत कपडे परिधान करणार नाही, असा निर्धार करणारा येवला तालुक्यातील तरुण शेतकरी कृष्णा डोंगरे आजही अर्धनग्न अवस्थेत राहात आहे. विधानसभा निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर कपडे परिधान करणार असल्याचे त्याने सांगितले आहे.


अजून 8 महिने त्याचे आंदोलन सुरू राहणार आहे. याही निवडणुकीत भाजप सरकार विजयी झाले तर पुढील लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आधीपासून अर्धनग्न आंदोलन करणार असल्याचं त्यानं सांगितलं.

सध्या हा तरुण शेतकरी काय करतो, त्याने कपडे घातले की नाही अशी चर्चा जिल्ह्यासह सोशल मीडियावर सुरू आहे.  सध्या तो येवला तालुक्यातील नगरसुल गावात शेती करतोय. शेतात सध्या पीकपाणी काहीच नसल्यानं पावसाची वाट बघत असल्याचं त्यानं सांगितलं.

जमिनीची मशागत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, एवढेच काम सध्या त्याच्या हाती आहे. सरकारचं धोरण चुकीचं असून शेतकरी विरोधी असल्याचा त्याचा आरोप आहे. त्यामुळेच मार्च महिन्यापासून त्याने आंदोलन सुरू केलंय. पुढील निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा आंदोलन सुरू करणार असल्याचे त्याने सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान नाशिक जिल्ह्यातील निफाडमधील राष्ट्रवादीच्या सभेत कृष्णा अर्धनग्न अवस्थेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना निवेदन देण्यासाठी स्टेजवर आला होता.  कृष्णा मोदी सरकारचा निषेध म्हणून गेल्या काही महिन्यांपासून अर्धनग्न अवस्थेत फिरत आहे. यावेळी शरद पवारांनीही तरुणाचं निवेदन स्वीकारत काळजी करु नको असं म्हटलं होतं.

कृष्णानं जमिनीच्या प्रश्नावरुन काही दिवसांपूर्वी आंदोलन केलं होतं. परंतु सरकारनं दडपशाही केल्याचा आरोप त्यानं केला होता. त्यानंतर मार्च महिन्यात कृष्णानं आपले कपडे आणि चप्पल पंतप्रधान कार्यालयाला स्पीड पोस्टने पाठवले. पोलिसांकडून माझं आंदोलन दडपण्याचा प्रयत्नही होत असल्याचा आरोप कृष्णाने केला होता.



संबंधित बातम्या

मुख्यमंत्र्यांना अल्बमसाठी 500 रुपये द्यायची इच्छा, येवल्याच्या 'त्या' अर्धनग्न तरुण शेतकऱ्याला


नाशिकमध्ये अर्धनग्न तरुण शरद पवारांच्या स्टेजवर, मोदी सरकार जाईपर्यंत कपडे न घालण्याचा तरुणाचा