बीड: शेतीच्या वादातून तीन शेतकऱ्यांचे कान कापण्याचा प्रयत्न बीडमधील शरूर कसारा तालुक्यात घडला. यावेळी एका शेतकऱ्याचे कान कापले असून इतर दोघांवरही प्राणघातक हल्ला झाला आहे.


 

शिरूर कासार तालुक्यातील खालापुरी येथे शेतीच्या वादातून नऊ जणांनी पंडीत परजने, हनुमान परजने आणि आश्रुबा परजने यांचे कान कापण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये पंडीत परजने या शेतकऱ्याचा कान कापण्यात आला असून उर्वरित दोघांवर प्राण घातक हल्ला झाला आहे.

 

या तिन्ही शेतकऱ्यांवर सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर शिरुर कासार ग्रामीण पोलीस ठाण्यात नऊ जाणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.